मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Cm Eknath Shinde and Bachchu Kadu : ...आणि मुख्यमंत्री शिंदे रात्री पोहोचले बच्चू कडूंच्या झोपडीत, विषय निघाला निकाली

Cm Eknath Shinde and Bachchu Kadu : ...आणि मुख्यमंत्री शिंदे रात्री पोहोचले बच्चू कडूंच्या झोपडीत, विषय निघाला निकाली

पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते.

पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते.

पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 30 डिसेंबर : पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.29) अखेर तिसऱ्या दिवशी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री अकराच्या सुमारास आंदोलनस्थळी गेले. त्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले.

मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी नंतर स्वत: झोपडीत जाऊन पाहणी केली. झोपडीत पालाच्या घरात राहणे साधी सोपी गोष्ट नाही. यासंदर्भात तातळीने बैठक लावू. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. तुमची मागणी मोठी नाही. तुम्हाला राहायला घर पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण व शहरी भागात जी तफावत आहे ती एकसमान करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा : अजितदादा, जयंतराव अन् पवार... राष्ट्रवादीतल्या घडामोडी फडणवीसांनी विधानसभेतच सांगितल्या

विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी भेट

धान उत्पादक शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टरी १५ हजार रु या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्याची घोषणा केल्याबद्दल वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

या सरकारने धानाला बोनस जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे . विद्यमान सरकार हे खरे शेतकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार असल्याचे सिद्ध झाले असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

हे ही वाचा : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाआधी महाविकासआघाडीची खेळी, राहुल नार्वेकरांनाच खिंडीत गाठलं!

ही बोनसची रक्कम ऑनलाइन पद्धतीने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र शासनाने राज्याला 15 लाख मेट्रिक टन धान खरेदीसाठी मंजुरी दिली आहे. या सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार दिला असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Nagpur, Nagpur News