नागपूर, 25 मार्च : गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं. त्यातच गारपीटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं. दरम्यान, आता विदर्भात नागपूरसह सर्वच जिल्ह्यांना २५ आणि २६ मार्च रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस सर्व जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात वादळी पावसाला पोषक असं हवामान असून २५ मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसंच राज्यात उन्हाचा पाराही वाढण्याची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.
कडू कारल्याची गोड कहाणी..! तीन एकरात लागवड करताच भंडाऱ्यातील शेतकरी मालामाल, अशी केली शेती
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांचा, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तामिळनाडूपासून, रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून जवळपास ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर तसेच रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पावसाला पोषक असं वातावरण तयार झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.