मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur: 4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा

Nagpur: 4 गर्लफ्रेंडच्या प्रेमात आंधळा झाला तरूण; आजीचाच कापला गळा, धक्कादायक खुलासा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Nagpur: काही दिवसांपूर्वी नागपुरातील (Nagpur) नंदनवन याठिकाणी एका निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृण हत्या (Retired woman doctor murder) करण्यात आली होती.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 07 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी नागपुरातील (Nagpur) नंदनवन याठिकाणी एका निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृण हत्या (Retired woman doctor murder) करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी वयोवृद्ध महिलेला खुर्चीला बांधून त्यांचा गळा चिरला होता. या दुर्दैवी घटनेत आजीचा जागीच मृत्यू झाला होता. या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तपास करत आरोपी नातवाला अटक केली होती. या घटनेचा तपास केला असता, अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तीन-चार गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करता यावी, यासाठी नातवाने आजीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नातू मितेश पाचभाई हा तीन ते चार प्रेयसींच्या संपर्कात होता. त्यांच्यासोबत मौजमजा करण्यासाठी मितेशला पैशांची गरज होती. पण आजी कडक स्वभावाची असल्याने ती आपल्या नातवाचा फाजील लाड पुरवत नव्हती. यामुळे आरोपीचा आपल्या वयोवृद्ध आजीवर राग होता. यातूनच आरोपीनं आपल्या आजीची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

हेही वाचा-पुण्यात बिल्डरला दिला भयंकर मृत्यू; 6 गोळ्या झाडून पाडला रक्ताचा सडा, कारण समोर

आरोपी मितेशचे आई वडील डॉक्टर असल्यामुळे ते दररोज सकाळी रुग्णालयात कामावर निघून जायचे. त्यामुळे घरी आजी देवकाबाई बोबडे आणि मितेश दोघेच घरी असायचे. दरम्यान आरोपी मितेश अभ्यास करण्याच्या बहाण्याने तीन-चार वेगवेगळ्या मुलींना घरी बोलवत असे. पण आजी कडक स्वाभावाची असल्याने ती नातवाच्या मैत्रिणींची चौकशी करत. याशिवाय आजी आरोपी मितेशच्या खोलीत वारंवार जाऊन तरुणींवर पाळत ठेवायची. त्यामुळे आजी आणि नातवाचं पटत नव्हतं. यातून दोघांत नेहमी खटके उडत होते.

हेही वाचा-27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस हॉटेलमध्ये सुरू होता भयावह प्रकार

यातूनच अय्याशी करण्यासाठी पैसे मिळावेत आणि अडसर दूर व्हावा, याच कारणातून आरोपीनं आपल्या आजीची निर्घृण हत्या केली आहे. घटनेच्या दिवशी देखील आरोपी मितेशला त्याच्या एका मैत्रिणीनं वारंवार फोन केला होता. पण आरोपी आजीचा खून करण्यात व्यग्र होता. त्यामुळे तो प्रेयसीचा फोन घेऊ शकला नाही. त्यामुळे संबंधित तरुणीनं 'गँगस्टर, कॉल मी' असा मेसेज पाठवला होता. याबाबत तपास केला असता, आरोपीची प्रेयसी त्याला प्रेमानं गँगस्टर म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Murder, Nagpur