मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : काय रुबाब, काय चाल..; नागपूरात सुर्या वाघाची हवा, पर्यटकांनाही लागलं वेड!

Video : काय रुबाब, काय चाल..; नागपूरात सुर्या वाघाची हवा, पर्यटकांनाही लागलं वेड!

नागपूरजवळील उमरेड कऱ्हाडा अभयारण्यातील सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. एकेकाळी जय वाघामुळे सेलिब्रेटीचं आकर्षण असलेल्या उमरेड क-हाडाच्या जंगलात आता सुर्या वाघाने पर्यटकांना अक्षरशः भूरळ घातली आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Ajay Deshpande

नागपूर, 25  नोव्हेंबर : नागपूरजवळील उमरेड कऱ्हाडा अभयारण्यातील सुर्या वाघाच्या ऐटदार चालीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. एकेकाळी जय वाघामुळे सेलिब्रेटीचं आकर्षण असलेल्या उमरेड क-हाडाच्या जंगलात आता सुर्या वाघाने पर्यटकांना अक्षरशः भूरळ घातली आहे. मायाचा बछडा असलेला सूर्या वाघ ताडोबातून उमरेड कऱ्हाडा अभयारण्यात पोहोचला आहे.

ताडोबातून उमरेड कऱ्हाडा अभयारण्यात  

सूर्या वाघ ताडोबातून उमरेड कऱ्हाडा अभयारण्यात दाखल झाला. तो आता इथेच स्थिरावला आहे.  तिथे फेरी वाघीणपासून त्याचे 5 बछडे झाले. तर कॉलरवाली वाघिणीपासून 3 बछडे झाले आहेत. कऱ्हाडा आणि गोठणगाव परिसरात सूर्या वाघाचा मुक्तसंचार आहे. त्याच्या रुबाबदार आणि दिमाखदार चालीमुळे सध्या तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे. पूर्वी जय वाघाला पहाण्यासाठी उमरेड कऱ्हाडा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी होत असे. आता सुर्याला पहाण्यासाठी पर्यटक अभयारण्यात गर्दी करत आहेत. सुर्यामुळे या अभयारण्याला पुन्हा एकदा पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे.

'सूर्याची' ऐटदार चाल 

आपन या व्हिडीओमध्ये सूर्याची ऐटदार चाल पाहू शकता. सुर्या वाघाने पर्यटकांना अक्षरशः भूरळ घातली आहे. या परिसरात सूर्या वाघ मुक्तसंचार करताना दिसून येत आहे. सूर्यामुळे पर्यटकांची पाऊले पुन्हा एकदा उमरेड कऱ्हाड अभयारण्याकडे वळले आहेत.

First published:

Tags: Nagpur, Nagpur News, Viral video.