मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंच्या जवळच्या माणसाची होणार चौकशी, फडणवीसांनी दिले आदेश

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या माणसाची होणार चौकशी, फडणवीसांनी दिले आदेश

भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरूण सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरूण सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरूण सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 30 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक चौकशीवरून आमनेसामने आले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान प्रकरणात एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. आता त्यापाठोपाठ युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांचीही चौकशी होणार आहे.

भाजपा आमदार योगेश सागर यांनी वरून सरदेसाई यांची विधानसभेत मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.

स्काऊट्स अँड गाईड नावाची संस्था वरून सरदेसाई स्थापन केली आणि या संस्थेमार्फत तुम्हाला नोकरी लावून देतो असं आश्वासन दिलं. तरुणांनी दहा-दहा लाख रुपये जमा करून सरदेसाई यांना दिले मात्र या तरुणांची फसवणूक झाली त्यांना कोणतेही नोकरी मिळाली नाही आणि हे तरुण विदर्भातले तरुण आहेत, त्यांनी शेतजमीन विकून पैसे दिलेले आहेत. त्यामुळे वरून सरदेसाई यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी योगेश सागर यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

(हेही वाचा : ...तेव्हा पटोले अजित पवारांसमोर नाक रगडत होते; बावनकुळेंनी पुन्हा 'मविआ'ला डिवचलं)

या सर्वांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर वरून सरदेसाई यांनी मुलांना धमकी दिली की मी तुम्हाला आता कोणतेही पैसे देणार नाही आणि याचा संवाद असलेला पेन ड्राईव्ह योगेश सागर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवला.

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

(हेही वाचा : शिवसेना भवन, सामना वर शिंदे गटाला ताबा मिळवता येईल? वाचा Inside Story)

तर दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास कोरोना काळात परराज्यातून 16,400 लिटर तूप मागवण्यात आले होते राज्यातील तूप विक्रेत्यांना डावलण्यात आले होते. नियमात कोणतीही तरतूद नसताना विश्वस्त मंडळांनी बेकायदेशीर रित्या पाच कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती, असा मुद्दा मांडला.

'यासंदर्भात तक्रार ची छाननी केली जात आहे. यासंदर्भात चौकशी १ महिण्यांच्या आत केली जाईल. चौकशी करून काही दोष आढळला तर कारवाई केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.

First published:

Tags: Ajit pawar, Marathi news, अजित पवार