मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : हजारो वर्षांपूर्वीचं वॉटर मॅनेजमेंट पाहण्याची सुवर्णसंधी, पाहा Video

Nagpur : हजारो वर्षांपूर्वीचं वॉटर मॅनेजमेंट पाहण्याची सुवर्णसंधी, पाहा Video

नागपूरकरांना भारताची पारंपरिक जल संचयन प्रणाली या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 21 नोव्हेंबर : आपल्या समृद्ध वारसा स्थळांचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे. या वारसा संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून जागतिक वारसा सप्ताह देशभर साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय असलेल्या मध्यवर्ती संग्रहालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागपूरकरांना  भारताची पारंपरिक जल संचयन प्रणाली या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे.

आपल्या देशातील समृद्ध प्राचीन वारशाबद्दल लोकांना, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व त्याचे महत्त्व पटावे यासाठी विविध स्तरावर जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील मध्यवर्ती संग्रहालयाच्या अस्थाई दालनामध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, नागपूर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताची पारंपरिक जल संचयन प्रणाली या विषयावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन 25 नोव्हेंबरपर्यंत नागपूरकरांना बघता येणार आहे. हडप्पा संस्कृतीच्या काळातील प्राचीन जल व्यवस्थापन आणि संवर्धन प्रणाली, फिल्टर यंत्रणा, 'ग्रेट बाथ' म्हणजे सामुदायिक आंघोळीसाठी वापरली जाणारी  जलसंधारण, इत्यादीसह भारतातील पारंपारिक जल संवर्धन प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रांची माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे.

पाणी संच संचयनाचे तंत्र

मुघल काळात कोरड्या भागात वापरलेले तंत्र, विविध प्रकारच्या विहिरी आणि पाणी व्यवस्थापन, अवाढव्य विहिरी, ज्यांना 'बावडी' देखील म्हणतात, सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करतात. विहिरी परिपूर्ण सममिती दाखवतात आणि पाणी साठवण्याच्या प्राथमिक उद्देशाव्यतिरिक्त सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांसाठी वापरल्या जात होत्या. असे अनेक जल व्यवस्थापन आणि संवर्धनाशी संबंधित अनेक पैलू या प्रदर्शनातून स्पष्ट होत आहेत, अशी माहिती  पुरातत्वविद, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर मंडळ, नागपूरच्या सहाय्यक अधिक्षण डॉ. शिल्पा जमगाडे यांनी दिली.

शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी!

जागतिक वारसा सप्ताह निमित्य दि. 19 ते 25 नोव्हेंबर 2022 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात नागपुरातील शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आपला वारसा आणि त्यांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचावे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या वारसा सप्ताह निमित्त मध्यवर्ती वास्तु संग्रहालयात प्रवेश मोफत असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत आपण भेट देऊन आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवू शकता, अशी माहिती मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहने यांनी दिली.

अशा प्रकारे आहेत कार्यक्रम 

दि. 22 वेळ सकाळी 11 आशुताेष बनसोडे यांचे प्रागैतिहासिक कालीन दगडी हत्यारे बनविण्याचे प्रात्यक्षिक, दि. 23 वेळ सकाळी 11 किल्लेदार प्रतिष्ठान यांचे किल्ला बनविण्याचे प्रात्यक्षिक, दि. 24 वेळ सकाळी 11 'योगार्ट' गुरुकौशल यांचे योग विद्याद्वारे स्मरण शक्ती वाढवण्यावर विशेष प्रात्यक्षिक, दि. 25 वेळ सकाळी 11 'अभिरुची फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाज हस्तकला स्पर्धा कला वेळ संध्या 4 वा बक्षीस वितरण व सांगता समारंभ या प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

First published:

Tags: Local18, Nagpur