Home /News /maharashtra /

'संभाजीनगर' नावावरुन विद्येच्या मंदिरातच राडा; शाळेच्या शिक्षिकेला शिवीगाळ

'संभाजीनगर' नावावरुन विद्येच्या मंदिरातच राडा; शाळेच्या शिक्षिकेला शिवीगाळ

औरंगाबादचे संभाजीनगरचा नामांतराचा वाद राज्यस्तरावर निवडल्यानंतर आता हा वाद वेगळे वळण घेत असल्याचा पाहायला मिळाले आहे.

    बुलढाणा, 23 जुलै : बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या नामांतरानंतर युवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शाळेत औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर म्हणून का शिकवत नाही, असे म्हणत दोन युवकांनी महिला शिक्षिकेस शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी बुलढाण्यात दोन्ही युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण बातमी - औरंगाबादचे संभाजीनगरचा नामांतराचा वाद राज्यस्तरावर निवळल्यानतंर आता हा वाद वेगळे वळण घेत असल्याचा पाहायला मिळाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात भूगोल विषय शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला शाळेमध्ये औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर म्हणून का शिकवत नाही? असे म्हणत दोन युवकांनी शिवीगाळ केली. तसेच तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला शिक्षिकेने दिलेल्या पोलीस तक्रारीवरून या दोन्ही युवकांविरोधात नांदुरा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जितू मोरे व अक्षय डंबेलकर, असे या दोन्ही युवकांचे नाव आहे. ते दोन्हीही बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील रहिवासी आहेत. एका महिला शिक्षिकेला औरंगाबादच्या नामांतरानंतर अशा पद्धतीने शिवीगाळ झाल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयाला स्थगिती अन्.. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला होता. यानंतर 16 जुलैला राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यात आले आहे. 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. हेही वाचा - औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव, आता शिंदेंकडून घोषणा 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे  नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. यानंतर आता 2022 मध्ये औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Buldhana news, Crime news

    पुढील बातम्या