मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गडचिरोली : लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दिले हे कारण

गडचिरोली : लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दिले हे कारण

फोटो क्रेडिट - लोकमत

फोटो क्रेडिट - लोकमत

अनिलने कसनसुर दलममध्ये काम केले आहे.

  • Published by:  News18 Desk
गडचिरोली, 21 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यात सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांनी आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या मध्ये जहाल माओवादी अनिल उर्फ रामसाय आणि रोशनी इरये या दोघांचा समावेश आहे. गंभीर घटनांमध्ये सहभाग -  अनिलने कसनसुर दलममध्ये काम केले आहे. पोलीस दलावर भूसुरंगस्फोटाद्वारे आणि गोळीबार करून हल्ला करणे, अशा गंभीर घटनांमध्ये तो सहभागी होता. अनिलने केलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक जवान शहीद तर दहा जवान जखमी झाले होते. तर रोशनी उर्फ इरयीने दलम सदस्य ते एसीएम आणि उपकमांडर पदावर काम केले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यासह पोलिसदलावर हल्लाच्या काही गंभीर घटनांमध्ये तिचा समावेश होता. अनिलवर चार लाखाचे तर रोशनीवर दोन लाखाचे बक्षीस आहे. या दोघांच्या आत्मसमर्पणाने माओवादी चळवळीला धक्का बसला आहे. अनिल हा एटापल्ली तालुक्यातील रा. तिम्मा जवेली येथील रहिवासी आहे. तर रोशनी ही छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील डांडीमरका या गावातील रहिवासी आहे. या दोघांनी आता नक्षल चळवळीपासून दूर जाऊन शांततेने जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. हेही वाचा - महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, 15 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी अखेर जेरबंद शासनाकडून दिले जाणार बक्षीस - वरिष्ठ माओवाद्यांकडून महिलांना लग्नासाठी बळजबरी केली जाते. तसेच चळवळीत महिलांना दुय्यम वागणुकीसह अनेक बाबतीत डावलले जाते, या कारणांमुळे आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता या दोघांनाही केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहितीही पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.
First published:

Tags: Gadchiroli, Police

पुढील बातम्या