मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भंडारा : दोन्ही भाऊ रात्री बिछान्यावर झोपले, रात्री काळ रुपाने आला साप अन्

भंडारा : दोन्ही भाऊ रात्री बिछान्यावर झोपले, रात्री काळ रुपाने आला साप अन्

हे दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपी गेले होते.

हे दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपी गेले होते.

हे दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपी गेले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  News18 Desk

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 12 सप्टेंबर : मृत्यू कधी, कुठे कुणाला कसा येईल, काही सांगता येत नाही. अशी एक दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. घरात झोपलेल्या दोन भावंडाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे. सुशील बलवीर डोंगरे (वय 8 वर्ष) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय 11 वर्ष) अशी मृत भावंडाची नावे आहे.

हे दोन्ही भाऊ रात्री एकाच बिछान्यावर झोपी गेले होते. मात्र, रात्री मागच्या दारातून साप आत आला आणि तो बिछान्यावर चढला असता त्या सापाने दोघाही भावांना दंश केला. यावेळी काहीतरी चावल्याचा भास झाला. मात्र, साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हेही वाचा - घरी परतणाऱ्या 2 शेतकऱ्यांवर पडली वीज, मृतदेहासह बैलगाडी पोहोचली घरी, विदर्भामध्ये एकाच दिवस 6 जणांचा मृत्यू

मात्र, भंडारा येथे उपचारादरम्यान भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे याचा रात्री मृत्यू झाला. तर भंडारा येथून दुसरा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Death, School children, Snake