मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अनियंत्रित ट्रक पलटल्याने घडली भयानक घटना, ट्रकखालीच ड्रायव्हरचा मृत्यु तर क्लीनर...

अनियंत्रित ट्रक पलटल्याने घडली भयानक घटना, ट्रकखालीच ड्रायव्हरचा मृत्यु तर क्लीनर...

काटोल वरुन चन्याची दाळ घेऊन हा ट्रक कोलकाताकडे निघाला होता.

काटोल वरुन चन्याची दाळ घेऊन हा ट्रक कोलकाताकडे निघाला होता.

काटोल वरुन चन्याची दाळ घेऊन हा ट्रक कोलकाताकडे निघाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 4 सप्टेंबर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अपघातामुळे काही ठिकाणी आपल्या प्राण गमावल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशी एक धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातून समोर आली आहे. अनियंत्रित ट्रक पलटल्याने ट्रकखाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यु झाला आहे. तर या अपघातात क्लीनर थोडक्यात बचावला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भंडारा जिल्ह्यातील धारगाव येथे घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

अनियंत्रित ट्रक पलटल्याने ट्रक खाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यु झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर धारगाव येथे घडली. रात्री 2 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेत क्लीनर हा थोडक्यात बचावला आहे. मृत डायव्हरचे नाव सर्वेश सोनी असे आहे. तो छत्तीसगढ़ येथील रहिवाशी होता.

काटोल वरुन चन्याची दाळ घेऊन हा ट्रक कोलकाताकडे निघाला होता. रस्ता न सूचल्याने ट्रक हा विरुद्ध बाजूला गेला. त्याला पुन्हा आपल्या योग्य दिशेने आणण्याच्या प्रयत्नात ट्रक पलटला. यात ट्रक खाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेनंतर याबाबतची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा - वाचनालयात अभ्यास करणाऱ्या तरुणाचा खून हत्या, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना

यानंतर क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला करत मृत ड्राइवर चे शव बाहेर काढण्यात आले आहे. कारधा पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.

First published:

Tags: Accident, Bhandara Gondiya, Death, Truck accident