नागपूर, 29 नोव्हेंबर : टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आशी ख्याती असलेल्या नागपूर शहराजवळच्या गावांमध्ये वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्षाच्या घटना कायम चर्चेत असतात. नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी येथील गावाजवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत अशीच एक घटना घडली आहे. या शाळेच्या परिसरात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे यांचा मुक्तवावर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला असून शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड धास्तीचे वातावरण आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी दुर्घटना घडण्याआधी गावाबाहेर असलेली शाळा गावात स्थलांतरित केली जावी अशी मागणी शिक्षण विभागाकडे पत्र लिहून करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही अगदी जंगलाला अगदी लागून असलेल्या भागात असून आजूबाजूच्या गावातील मुलं येथे शिकायला येतात. गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे सर्वत्र धास्तीचं वातावरण आहे.
या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक दहशतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत तर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत येणेच बंद केल्याचे आढळून आले आहे. शाळेच्या परिसरात एक वाघीण आणि तिचे दोन बछडे यांचा वावर शाळेतील विद्यार्थ्यांनीही पाहिला आहे. शिवाय आजूबाजूचे नववारी, खातमारी गावातही वाघाने गाई बैलांवर हल्ल्या केल्याच्या घटना घडल्याचे ताजे प्रकरण असताना असाच कुठलाही अनुचित प्रकार घडण्याआधी, आणि कुणाचा नाहक जीव जाण्यापूर्वी ही बाब गांभीर्यानं घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. त्यांनी याबाबतचं पत्र शिक्षण विभागाला लिहलंय.
Nagpur : मोकाट कुत्र्यांना अन्न भरवताना घ्यावी लागणार काळजी, पालिकेचा मोठा निर्णय
जंगलाला लागून असलेल्या शाळेची सध्याची इमारतही मोडकळीस आली असून वर्ग खोल्यांची मोठ्यप्रमाणावर दुरावस्था झाली आहे .त्याचाही विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.परिणामी विद्यार्थ्यांची हित आणि उद्भवलेला धोका लक्षात घेऊन या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालून मोठी दुर्घटना घडण्याआधी गावाबाहेर असलेली शाळा गावात स्थलांतरित केली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.