नागपूर, 21 मार्च : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी या गुंडाच्या नावाने हा धमकीचा फोन आला असून 10 कोटींची खंडणी मागितली आहे. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात पुन्हा एकदा धमकीचा फोन आला. दोन वेळा हा फोन करण्यात आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने जयेश पुजारीच्या नावाने फोन केला होता. फोनवर या व्यक्तीने 10 कोटींची खंडणी मागितली. एकापाठोपाठ दुसऱ्यांदा फोन आल्यामुळे नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली.
(माझं काही चुकलं का? म्हणत पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा, म्हणाल्या...)
याआधी देखील गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन आले होते. जयेश पुजारी या नावानेच हे फोन आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरला जाऊन चौकशी केली होती. पण त्याने हे फोन कॉल केले नाही अशीच माहिती दिली होती. आता या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरींच्या कार्यालयात चौकशी करत आहे.
नितीन गडकरींनी वारंवार कोण देतंय धमकी?
दोन महिन्यांपूर्वी 14 जानेवारीला नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना 3 वेळा फोन करून धमकी देण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली होती आणि 2 कोटी खंडणी मागितली होती. पण हा फोन दुबई नाही तर बेळगाव तुरुंगातून आला होता.
हा कॉल एका सराईत गँगस्टरने केला होता. तो सध्या बेळगाव तुरुंगात आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले होते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन कॉलच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या गुन्हेगाराचे नाव जयेश पुजारी असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बेळगावला जाऊन चौकशी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news, Nitin gadkari