Home /News /maharashtra /

उमेश अन् युसूफच्या मैत्रीचा भयावह शेवट, मित्रानेच केला घात; अमरावतीतील हत्येचा मोठा खुलासा

उमेश अन् युसूफच्या मैत्रीचा भयावह शेवट, मित्रानेच केला घात; अमरावतीतील हत्येचा मोठा खुलासा

आरोपींनी ज्या प्रकारे उमेश कोल्हेवर हल्ला केला, त्या एका चाकुच्या वारामुळे उमेशला झालेली जखम ही 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल होती.

    अमरावती, 3 जुलै : अमरावतीतील (Amravati Crime News) हत्या करण्यात आलेले केमिस्ट उमेश कोल्हे यांच्या छोट्या भावाने खळबळजनक खुलासा केला आहे. महेशने सांगितलं की, हत्येचा आरोप असलेला युसूफ माझा भाऊ उमेशचे खूप जवळचे मित्र होते. महेशने सांगितलं की, उमेश आणि युसूफ यांनी बराच वेळ एकत्र घालवला आहे. इतकच नाही तर हत्येनंतर युसूफ उमेशच्या अंत्यसंस्कारातही हजर होते. महेशने पुढे सांगितलं की, उमेश आणि युसूफ यांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. उमेशचा वेटरनरी केमिस्टचा व्यवसाय होता. तर मुख्य आरोपी युसूफ वेटरनरी रुग्णालयात काम करीत होता. त्यामुळेही दोघे एकमेकांसोबत अधिक वेळ घालवत असे. मात्र युसूफची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्याने अनेकदा भाऊ उमेशकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. उमेशने आतापर्यंत 1 लाखांहून अधिक पैसे कर्जाऊ दिले होते. युसूफच्या बहिणीच्या लग्नासाठीही मदत... महेशने सांगितलं की, उमेशने युसूफच्या बहिणीच्या लग्नासाठी त्याला मदत केली होती. 54 वर्षीय उमेश आणि आरोपी युसूफसोबत एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एकत्र होते. ज्यात उमेशने चुकून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. महेशने सांगितलं की, त्याचा भाऊ उमेशला माफी मागण्याची संधीही मिळाली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खुलासा... आरोपींनी ज्या प्रकारे उमेश कोल्हेवर हल्ला केला, त्या एका चाकुच्या वारामुळे उमेशची मेंदूला जाणारा नस, श्वास घेणारी नलिका आणि डोळ्याची नस डॅमेज झाली. म्हणजे हा वार इतका रागात आणि आवेगात करण्यात आला, ज्यामुळे झालेली जखम ही 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Murder, Muslim, अमरावतीamravati

    पुढील बातम्या