विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 27 फेब्रुवारी: सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वातावरणात देखील त्या बाबत कमालीचा बदल जाणवत असून उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने विदर्भातील उन्हाळा उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक उष्ण गणला जातो. नागपूरकर दरवर्षी दाहक उन्हाळा अनुभवतात. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याचा तडाखा वाढेल, असा अंदाज नागपुरातील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने वर्तवला आहे.
फेब्रुवारीपासूनच उष्णता वाढली
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सूर्याचा परा चढायला लागला असून दिवसा चांगलेच उन तापायला सुरवात झाली आहे. दिवसाचे तापमान 37°सेल्सिअस पर्यंत गेल्याचे दिसत आहे. येत्या काळात हे तापमान काय नवे उच्चांक गाठते हे बघणे अधिक उत्सुकतेचे ठरणार आहे. दिनाक 27 फेब्रुवारी रोजी नागपुरातील किमान तापमान 17.0° सेल्सिअस तर कमाल 35.8°सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आगामी काळात हे तापमान वाढण्याची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक मौसम केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
नागपुरात सरासरीपेक्षा जास्त तापमान
नागपूरला मागील 24 तासातील तापमानात 1.1 अंशाची घसरण होऊन रविवारचे तापमान 35.2अंशावर पोहोचले होते. तरीही हे तापमान सरासरीपेक्षा 2.6 अंशाने अधिक आहे. दिवस व रात्रीच्या तापमानाती तफावत जाणवत असल्याने रात्री घरात गर्मी व बाहेर गारवा जाणवत असल्याचे निदर्शनात आले आहे. रात्रीचे तापमान 16.6 अंशावर असल्याने बाहेर काहीसा गारवा जाणवत आहे पुढच्या आठवड्याभरात किमान तापमान १९ अंशावर पोहोचण्याचा अंदाज आहे तर दिवसाचा पार आहे 38 अंशावर पोहोचण्याचा अंदाज आहे.
उन्हाळ्यात महागाईचे चटके, थंड हवाही झाली महाग! Video
नागपुरात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार
आज घडीला नागपुरातील किमान तापमान 17.0° सेल्सिअस तर कमाल 35.8°सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. किमान तापमान मध्ये 2-3° सेल्सिअस पेक्षा विशेष बदल होणे अपेक्षित नाही. मात्र कमाल तापमान 38°सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर येथील वैज्ञानिक डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले.
थंडी, पावसाची शक्यता नाही
थंडी आणि पावसाबद्दल आगामी काळात कुठलीही शक्यता नाही. वातावरणात होणारा बदल आणि उन्हाच्या तीव्रता नागरिकांसाठी शरीराची कसोटी बघणारे राहणार आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन बाहेर पडावे. उर्वरित विदर्भातील वातावरणात देखील थोड्या अधिक फरकाने बदल होऊ शकतो. हा उन्हाळा काय नवे उच्चांक गाठतो या वर सध्यातरी बोलणे ठीक नाही. मात्र नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. प्रवीण कुमार यांनी केले.
नागपूर जवळचं वाघाचं घर, 'जंगल बुक'शी आहे खास कनेक्शन! Video
शहर कमाल तापमान किमान तापमान
अकोला 38.3 16.0
अमरावती. 36.6 17.3
बुलढाणा 36.0 18.2
ब्रम्हपुरी 38.2 17.4
चंद्रपूर 37.0 19.2
गडचिरोली 33.8 15.6
गोंदिया. 36.5 16.2
नागपूर. 35.8 17.0
वर्धा. 37.0 18.6
वाशिम 38.2. 16.0
यवतमाळ. 36.0 17.5
आगामी काळात नागपुरातील तापमानात कसे असेल या बाबत शक्यता वर्तवली आहे.
दिनांक कमाल तापमान किमान तापमान
27-Feb 18.0. 36.0
28-Feb 18.0 37.0
01-Mar 19.0 36.0
02-Mar 19.0 37.0
03-Mar 20.0 38.0
04-Mar. 20.0 38.0
05-Mar 20.0 38.0
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nagpur, Nagpur News, Summer season, Weather Forecast