मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यातल्या कोयता गॅंगनंतर आता नागपुरात तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात तोडफोड

पुण्यातल्या कोयता गॅंगनंतर आता नागपुरात तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात तोडफोड

नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गुंडानी हातात तलवारी घेऊन तोडफोड केली आहे.

नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गुंडानी हातात तलवारी घेऊन तोडफोड केली आहे.

नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गुंडानी हातात तलवारी घेऊन तोडफोड केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, चार फेब्रुवारी :  नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गुंडानी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गुंडांकडून बाजारात तोडफोड देखील करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. मात्र या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोन गटाच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

नेमकं काय घडलं? 

शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानच्या आठवडी बाजारात अचानक काही जणांनी येऊन तोडफोड करायला सुरुवात केली. त्यांच्याजवळ तलवारी देखील होत्या. त्यांनी या तलवारी हातात फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.  या घटनेमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दोन गटाच्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा : नाशकात तरुणींमध्ये दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल 

पुण्यात कोयता गँगची दहशत

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या गॅंगमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील अनेकाना ताब्यात घेऊन पोलिसांनी कोयता गॅंगची दहशत मोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील अनेक ठिकाणी हा प्रकार सुरूच आहे. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी आता पोलिसांनी अनोखी युक्ती शोधून काढली आहे. इथून पुढे पुण्यात ज्याला पण कोयता खरेदी करायचा असेल त्याला आधी आपलं आधार कार्ड द्यावं लागणार आहे.

First published:

Tags: Nagpur