मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर महापालिकेत लाखोंचा स्टेशनरी घोटाळा, वरिष्ठ अधिकारी तपास यंत्रणेच्या रडारवर

नागपूर महापालिकेत लाखोंचा स्टेशनरी घोटाळा, वरिष्ठ अधिकारी तपास यंत्रणेच्या रडारवर

काही कंत्राटदारांनी पालिकेला स्टेशनरी साहित्य न पुरवता लाखोंच्या बोगस बिलांची उचल केली. यासाठी आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागगाच्या अधिकार्‍यांचा पासवर्ड वापरण्यात आल्याचे पुढे आले आहे.

काही कंत्राटदारांनी पालिकेला स्टेशनरी साहित्य न पुरवता लाखोंच्या बोगस बिलांची उचल केली. यासाठी आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागगाच्या अधिकार्‍यांचा पासवर्ड वापरण्यात आल्याचे पुढे आले आहे.

काही कंत्राटदारांनी पालिकेला स्टेशनरी साहित्य न पुरवता लाखोंच्या बोगस बिलांची उचल केली. यासाठी आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागगाच्या अधिकार्‍यांचा पासवर्ड वापरण्यात आल्याचे पुढे आले आहे.

नागपूर, 23 डिसेंबर : नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. स्टेशनरी घोटाळ्या प्रकरणी (NMC stationery scam) सहाय्यक आयुक्त विजय कोल्हे (Vijay Kolhe) आणि मुख्य लेखा विजय धामे (Vijay Dhame) यांचीदेखील चौकशी केली जावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर (Prakash Bhoyar) यांनी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पुरवठादार आणि दोन कर्मचारी असे एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमका घोटाळा काय?

काही कंत्राटदारांनी पालिकेला स्टेशनरी साहित्य न पुरवता लाखोंच्या बोगस बिलांची उचल केली. यासाठी आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागगाच्या अधिकार्‍यांचा पासवर्ड वापरण्यात आल्याचे पुढे आले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 57 लाख, जन्म मृत्यू नोंदणी विभागाला 1 कोटी 10 लाख व घनकचरा विभागाला 56 लाखाची स्टेशनरी व प्रिंटिंग साहित्यात न पुरवता खोटी बिले देण्यात आली. याची कसलीही चौकशी न करता बिले सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने मंजूर करून आरोपी पुरवठादारांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे हा घोटाळा आताचा नसून मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असावा, असा संशय स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी व्यक्त केला. त्यामुळे मागच्या पाच वर्षातील सर्व स्टेशनरीच्या व्यवहाराची चौकशी व्हावी व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ

चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कोलबा साकोळे, अतुल साकोळे व वित्त विभाग सामान्य प्रशासन विभागमधील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे एकमेकांच्या परिचयातील असून त्यांनी बोगस कंपन्यांच्या नावाने ही बिले तयार केली होती. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही आरोपींना देखील अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : महिलांच्या सुरक्षेसाठी विरोधकांचंही एकमत, 'शक्ती कायद्या'ला विधानसभेत मंजुरी

बोगस बिलांच्या फाईल पास झाल्यानंतर फाईली गायब

महत्त्वाचे म्हणजे आरोपी बोगस बिलांच्या फाईल पास झाल्यानंतर वित्त विभागातून त्या फाईली गायब करत होते. त्यामुळे पालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी या भ्रष्टाचारालामध्ये सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थितीचे गांभीर्य बघता पालिका आयुक्तांनी देखील अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती या घोटाळ्याच्या तपासासाठी गठीत केली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे हा घोटाळा किती मोठा आहे आणि या घोटाळ्यात कोण कोण गुंतले आहे? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

First published: