मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नागपुरात नात्याला काळीमा, मुलाचे आईसोबत धक्कादायक कृत्य; आरोपीला अटक

नागपुरात नात्याला काळीमा, मुलाचे आईसोबत धक्कादायक कृत्य; आरोपीला अटक

नागपुरात मुलानेच केली आईची हत्या

नागपुरात मुलानेच केली आईची हत्या

या प्रकरणातील आरोपीला दारूचे वेसन असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 30 जानेवारी :  नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, व्यसनाधीन मुलाने आपल्या आईची  हत्या केली आहे. या घटनेनं शरहरात खळबळ उडाली आहे.  नागपूरच्या वनदेवीनगरातील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. गोविंद संतराम काटेकर असे आरोपी मुलाचं नाव असून, विमलाबाई संतराम काटेकर असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आरोपीला दारूचे वेसन  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गोविंद याला दारूचे वेसन होते. तो कुठलेही काम करत नव्हता. दारूसाठी पैसे लागत असल्यानं तो सातत्यानं आपली आई विमलाबाई यांच्याकडे पैशांची मागणी करत असे, त्याला पैसे न दिल्यास तो त्यांना मारहाण देखील करत होता. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्याने आपल्या आईवर विळ्याने सपासप वार केले. या घटनेत विमलाबाई यांचा मृत्यू झाला. नागपुरातल्या वनदेवीगरातील ही घटना आहे.  पोलिसांनी आरोपी मुलाल बेड्या ठोकल्या आहेत. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आईला मारहाण  

समोर येत असलेल्या माहितीनुसार आरोपी गोविंद याला दारूचे वेसन होते. दारू पिण्यासाठी त्याला सतत पैसे लागत होते. तो कुठेही काम करत नव्हता. तो आपल्या आईकडे सतत पैशांची मागणी करत असे, पैसे न मिळाल्यास तो आईला मारहाण करत असे. त्याने आपल्या आईवर विळ्याने वार करत हत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

First published:

Tags: Nagpur