मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांच्या नागपुरातील उद्योगपतींचा देशात डंका, श्रीमंताच्या यादीत 6 जणांची नावं

फडणवीसांच्या नागपुरातील उद्योगपतींचा देशात डंका, श्रीमंताच्या यादीत 6 जणांची नावं

फोटो क्रेडिट - लोकमत

फोटो क्रेडिट - लोकमत

आतापर्यंत श्रीमंतांच्या यादीत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद या शहरांचे प्राबल्य दिसून येत होते. मात्र, या यादीत नागपूरच्या उद्योगपतींचा समावेश झाल्याने शहराची मान उंचावली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नागपूर, 15 नोव्हेंबर : नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तसेच नागपूरची देशात ओळख आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने नागपूर देशात राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान आहे. आता याच नागपूरची ओळखमध्ये आणखी भर पडली आहे. देशातील सर्वात सर्वात 1036 श्रीमंत लोकांच्या यादीत नागपूर येथील 6 जणांचा समावेश झाला आहे.

देशपातळीवरील एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षण केले. आतापर्यंत श्रीमंतांच्या यादीत दिल्ली, मुंबई, अहमदाबाद या शहरांचे प्राबल्य दिसून येत होते. मात्र, या यादीत नागपूरच्या उद्योगपतींचा समावेश झाल्याने शहराची मान उंचावली आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत नागपूर हे कार्यक्षेत्र असलेल्या सहा उद्योगपतींचा समावेश करण्यात आला आहे.

देशपातळीवरील एका खासगी संस्थेच्या अहवालात देशातील तब्बल 1.36 श्रीमंत उद्योगतपतींचा समावेश करण्यात आला. त्यात नागपूर येथील 6 उद्योगपतींचा समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण संबंधित उद्योगपतींनी त्यांच्या उद्योग व्यवसायात केलेली गुंतवणूक, उत्पादन, त्यातून झालेला नफा आणि त्यांच्या एकूण संपत्तीच्या वर्तमान मूल्याच्या आधारावर करण्यात आले आहे. या सहा उद्योगपतींमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

- सोलर इंडस्ट्रीज इंडिया केमिकल्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्सचे संचालक सत्यनारायण नुवाल (120 क्रमांक),

- हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल फूड ॲण्ड बेव्हरेजेसचे राजेंद्रकुमार शिवकिशन अग्रवाल (327 क्रमांक),

- कमलकुमार शिवकिशन अग्रवाल (411 क्रमांक),

- शिवकिशन मूलचंद अग्रवाल (459 क्रमांक)

- सुशीलकुमार शिवकिशन अग्रवाल (598 क्रमांक) आणि

- जयस्वाल नेको इंडस्ट्रीजचे संचालक बसंत लाल शॉ (987 क्रमांक) यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचा - आता गरिबाची पोरंही शिकणार विदेशात, एक हजार विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी 'एकलव्य'चा पुढाकार

पहिल्या दहामध्ये कुणाचा समावेश?

तर या यादीत पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी, दुसऱ्या क्रमांकावर मुकेश अंबानी, तिसऱ्या क्रमांकावर सायरस पुनावाला, चौथ्या क्रमांकावर शिव नाडर, पाचव्या क्रमांकावर राधाकिशन दमानी, सहाव्या क्रमांकावर विनोद शांतीलाल अदानी, सातव्या क्रमांकावर एसपी हिंदुजा, आठव्या क्रमांकावर एलएन मित्तल, नवव्या क्रमांकावर दिलीप संघवी आणि दहाव्या क्रमांकावर उदय कोटक या दिग्गज उद्योगपतींचा समावेश आहे.

दरम्यान, या यादीमध्ये नागपूरसोबतच औरंगाबाद येथील उद्योगपतींचाही समावेश आहे. तर नागपुरातील या सहा उद्योगपतींकडे एकूण 30 हजार 600 कोटींची संपत्ती असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

First published:

Tags: Business News, Nagpur News