नागपूर, 23 डिसेंबर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. कविता चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार उठ सूट कुणीही संतांचा आपमान करतो, महापुरुषांचा अपमान करतो, मात्र सरकार त्यावर काहीच भूमिका घेत नाही. याचा राग व्यक्त करण्यासाठी या महिलेनं स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. चव्हाण या सोलापुरच्या रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
...तर घडला असता मोठा अनर्थ
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. विविध विषय उपस्थित करून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी देखील विरोधकांना तोडीस तोड उत्तर देत असल्यानं अधिवेशनाचे आतापर्यंतचे सर्व दिवस वादळी ठरले आहेत. विरोधकांकडून महापुरुषांच्या अवमानाचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. मात्र हे सर्व सुरू असताना आज अचनाक एका महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. कविता चव्हाण असं या महिलेचं नाव असून, महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी तीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना वेळीच सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.
परिसरात गोंधळाचे वातावरण
महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र काही काळ विधानभवन परिसरात चांगलीच धावपळ उडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Nagpur, Nagpur News, Winter session