मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना फुटीमागे पवारांचा हात? केसरकरांच्या आरोपांना पवारांचं एका वाक्यात उत्तर

शिवसेना फुटीमागे पवारांचा हात? केसरकरांच्या आरोपांना पवारांचं एका वाक्यात उत्तर

Maharashtra Politics : शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या सर्व फुटींमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

  • Published by:  Rahul Punde

नागपूर, 15 जुलै : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आले आहेत. पवार यांनी नागपूर जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी पक्षाची आगामी भूमिका मांडली. आता तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीसोबत लढणार? हे स्पष्ट केलं. सोबत शिंदे आमदार केसरकर यांच्या आरोपांवरही पवार यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं.

काय म्हणाले होते केसरकर?

शिवसेना फुटीमध्ये पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे आवाहनही त्यांनी केले. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते, असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

केसरकरांच्या आरोपांना पवारांचं एका वाक्यात उत्तर

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या आरोपांवर शरद पवार यांना विचारलं असता पवारांनी हे महत्व द्यावं असं हे वक्तव्य नाही, म्हणत एका वाक्यात उत्तर दिलं.

ठाकरेंचा 'तो' निर्णय बेकायदेशीर! उद्याच कॅबिनेट घेऊन संभाजीनगर करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

केंद्र सरकारवर टीका

सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात, शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, उद्या आम्ही बैठकीत ह्यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू .

महापालिका निवडणुका एकत्रित लढणार का?

जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले तर लोकांना त्यांच्या मनासारखे मतदान करता येईल. मला असं वाटतं पण आम्हाला बैठका कराव्या लागतील.

शिंदे सरकारवर टीका

पूर परिस्थितीत प्रशासन ठप्प असल्याचे दिसत आहे. दोघंच जण आहेत. राज्यातील परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे. बांठीया आयोगाचा अहवाल आला आहे म्हणे, पण त्यात काय आहे ते माहिती नाही, काही चुकीचे आहे का ते बघावे लागेल. काही नवीन केले असते तर मी अभिनंदन केले असते. पण, आधीचे निर्णय रद्द करणे आणि हे दाखवणे की काहीतरी मोठे केले आहे.

First published:

Tags: शरद पवार. sharad pawar