मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी, शरद पवार पोहोचले नितीन गडकरींच्या घरी, लंचही एकत्र करणार, राजकीय चर्चांना उधाण

मोठी बातमी, शरद पवार पोहोचले नितीन गडकरींच्या घरी, लंचही एकत्र करणार, राजकीय चर्चांना उधाण

एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुखंही सोबत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

उदय तिमांडे, प्रतिनिधी

नागपूर, 01 एप्रिल : राज्याच्या राजकारणात सध्या भेटी गाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर आज नागपूरमध्ये शरद पवार हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी पोहोचले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांचं नागपूर नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुखंही सोबत आहेत. विविध राजकीय आणि कृषी च्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या घरी जेवन करणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचं समजतंय. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली.

First published:
top videos