मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवार यांचे मुस्लिम समाजाविषयी मोठं वक्तव्य; म्हणाले बॉलिवूडमधील योगदानाकडे..

शरद पवार यांचे मुस्लिम समाजाविषयी मोठं वक्तव्य; म्हणाले बॉलिवूडमधील योगदानाकडे..

नागपूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुस्लिम समाजाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

नागपूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुस्लिम समाजाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

नागपूर येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुस्लिम समाजाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नागपूर, 8 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षांपासून देशात अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यावरुन चर्चा सुरू आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जर आपण आज कला, कविता आणि लेखन याबद्दल बोललो, तर अल्पसंख्याकांमध्ये या क्षेत्रांमध्ये योगदान देण्याची कमाल क्षमता आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? असा प्रश्न करत मुस्लिम समाजाचे योगदान सर्वात जास्त असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. नागपूर येथील भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशनात पवार बोलत होते.

काय आहे प्रकरण?

नागपूर येथे भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशन भरवण्यात आले आहे. या अधिवेशात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी देशातील अल्पसंख्याक समाजाविषयी त्यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, की जर आपण आज कला, कविता आणि लेखन याबद्दल बोललो, तर अल्पसंख्याकांमध्ये या विभागांमध्ये योगदान देण्याची कमाल क्षमता आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? असं सांगत मुस्लिम अल्पसंख्याकांचे योगदान सर्वात जास्त आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

वाचा - व्वा भिडू! इंद्रायणी नदीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर रोखठोक, तरुणाने जिंकली सर्वांची मनं, पाहा VIDEO

काय म्हणाले पवार?

भटके विमुक्त जमाती संघटनांनी 50 वर्षे कष्ट केले आहेत, त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. 1952 साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला.

भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासुन मुक्ती झाली असं आजंही वाटत नाही, यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल.

शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांचे मार्ग वेगळे होते, काही लोकांना ते आवडले नसेल.

भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही.

संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल.

या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्तीविरोधात मशाली पेटवली पाहिजे.

First published:

Tags: Muslim, Sharad Pawar