मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; प्रोफेशनल सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; प्रोफेशनल सलूनमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Nagpur: नागपूर शहरातील अजनी चौक परिसरातील एका प्रोफेशनल सलूनमध्ये (professional family salon) सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (sex racket exposed) केला आहे.

  • Published by:  News18 Desk

नागपूर, 13 डिसेंबर: नागपूर (Nagpur) शहरातील अजनी चौक परिसरातील एका प्रोफेशनल सलूनमध्ये (professional family salon) सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (sex racket exposed) केला आहे. यावेळी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक (1 arrested) केली असून दोन तरुणींना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या दोन तरुणींपैकी एक तरुणी ही परित्यक्ता आहे. तर दुसरी तरुणी ही घरच्यांना अंधारात ठेवून हा व्यवसाय करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

रवी दशानन चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अजनी परिसरातील चुनाभट्टी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याचं अजनी चौकातील भवानी चेंबरमध्ये 'रिडिफाइन द प्रोफेशनल फॅमिली सलून' नावाचं दुकान आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी याठिकाणी फॅमिली सलूनच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत होता.

हेही वाचा-पुणे: पुतणीसोबत काकाचं घृणास्पद कृत्य, 4महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

तो सलूनमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांना वेश्या पुरवत होता. त्यासाठी आरोपी शहरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला आणि मुलींच्या संपर्कात होता. तो आपल्या सलूनमध्ये या वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलींना जागा उपलब्ध करून देत होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा-लग्नाच्या वाढदिवसाआधीच वाईट घडले, विवाहितेचा घरात आढळला मृतदेह

पोलिसांनी संबंधित सलूनमध्ये सापळा रचून बनावट ग्राहक पाठवला होता. आरोपीनं 3 हजार रुपयांत वेश्या उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी चौधरी हा ग्राहकांकडून प्रत्येकी 3 हजार रुपये घेत होता. तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांना तो प्रत्येक ग्राहकामागे केवळ 500 रुपये देत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून याचा पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur, Sex racket