मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nagpur : गरजूंना मिळते मोफत अन्न आणि वैद्यकीय सेवा, 5 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम Video

Nagpur : गरजूंना मिळते मोफत अन्न आणि वैद्यकीय सेवा, 5 वर्षांपासून सुरू आहे उपक्रम Video

दात्यांकडून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सेवा फाउंडेशन एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 14 नोव्हेंबर : भारतीय संस्कृतीत अन्न दान हे श्रेष्ठदान मानला गेले आहे. नागपुरातील  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी विदर्भ, मध्य प्रदेश येथील रुग्ण येतात. उपचारासाठी रुग्णालयात काही दिवस भरती व्हावे लागते. अशावेळी बाहेरील रुग्ण आणि नातेवाईक यांची खाण्याची मोठी तारांबळ उडते. अशावेळी सेवा फाउंडेशनच्या वतीने मोफत अन्नसेवा पुरवली जाते.

गेल्या पाच वर्षापासून सेवा फाऊंडेशन अविरतपणे अन्न सेवा देत आली आहे. भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण नित्यनेमाने सेवा फाउंडेशन मोफत वाटप करत असते. यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सामाजिक अधीक्षक (सोशल कॉलच्या) माध्यमातून गरजूंना मोफत औषधी, माफक दरात रुग्णवाहिका, कॅन्सर  पीडित कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सेवा, रक्तपुरवठा इत्यादी महत्त्वपूर्ण कार्य करत आलेली आहे. दात्यांकडून गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सेवा फाउंडेशन एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरले आहे.

Nagpur : देशभर दरवळतो उमरेडच्या अगरबत्तीचा सुगंध, पाहा Video

राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मी स्वतःला सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून दिले. नागपूर परिक्षेत्रात शासनाचे पाच शासकीय वैद्यकीय रुग्णालय आहेत. त्यात प्रामुख्याने मेडिकल, सुपर, मेयो, डागा, एम्स यांचा समावेश आहे. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्ण दाखल होतात. मात्र परिस्थिती नसणाऱ्या रुग्णांसाठी सेवा फाउंडेशन जमेल त्या पद्धतीने सहकार्य करत असते.

सकाळ- संध्याकाळ अन्नसेवा

रोज सकाळ- संध्याकाळ मेडिकल बाहेर अन्नसेवा दिली जाते. दररोज शेकडो लोक जेवण करतात. जेवण दर्जेदार असून मेडिकल मधील रुग्णांसाठी एक मोठी मदत आहे. सेवा फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेची स्थापना 2017 साली आली. नारायण संस्था, रोटी फाउंडेशन, आणि सेवा फाउंडेशन यांच्या वतीने दररोज दोनशे ते तीनशे लोकांना दर्जेदार जेवण मोफत वाटण्यात येत असल्याचे सेवा फाउंडेशनचे रामदास ठवकर यांनी सांगितले.

First published:

Tags: Local18, Nagpur