विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 25 मार्च: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरलेला आणि नागपूरला मुंबईशी जोडणारा महामार्ग म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग होय. समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. शिवाय जलद प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळेची देखील मोठी बचत झाली. मात्र, या महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता ही बाब अतिशय चिंतेची ठरत आहे. आता अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील 10 जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तब्बल 701 किलोमीटर लांबीचा आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांना जोडला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पंतप्रधानांनी तोंडभर कौतुक केले. उद्घाटन झाल्यानंतर लाखो प्रवासी या समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत आहेत.
शिर्डी नागपूर मार्गावर अपघातांची मालिका
गेल्या काही काळापासून शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. अपघातांची संख्या सातत्याने वाढत असल्याने बाब चिंतेची ठरली आहे. यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपायोजना आखण्यात आली असून समृद्धी महामार्गावर आठ समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. परिवहन खाते आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत समुपदेशन केंद्र सुरु करण्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाईलमध्ये ऐकता येणार आसपासच्या लोकांचं बोलणं; नाव आणि पत्ताही समजणार, तरुणाने बनवलं अनोखं डिव्हाईस
नागपूर ते शिर्डी 8 समुपदेशन केंद्र उभारणार
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. कळसकर यांनी आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यात येत्या सात दिवसांत ‘एमएसआरडीसी’ला प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमाणे नागपूर ते शिर्डी दरम्यान 8 समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना सक्तीने रोखून या केंद्रावर आणून 30 मिनिटे ते 1 तास आरटीओकडून समुपदेशन केले जाणार असल्याची महिती देण्यात आली आहे.
Success Story : कर्ज काढून दोन्ही भावांनी सुरू केला व्यवसाय, आता वर्षाला 30 लाखांचा टर्नओव्हर
अपघातांचा आकडा 900 च्या वर
समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडा 900 पेक्षा अधिक आहे, तर समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात मागील तीन महिन्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात रोखण्यासाठी नागपूर ते शिर्डी दरम्यान 8 समुपदेशन केंद्र उभारली जाणार आहेत. येत्या सात दिवसात ही समुपदेशन केंद्र कार्यन्वित होणार आहे.
तर होणार कारवाई
वेगाने वाहन चालवणे, टायर मध्ये हवा नसलेल्या, शिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांना प्रथम रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारी छायचित्रे दाखवली जाणार आहेत. एक प्रश्नपत्रिका सोडवून घेत, नियमात वाहन चालवण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाणार आहे. सर्व मार्गावर रस्ता सुरक्षा फलक लावले जाणार आहेत. टोल नाक्यावर पीए सिस्टिम लावले जातील. ट्रक चालकांसाठी विश्रांती आणि पार्किंग व्यवस्था निर्माण केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nagpur, Nagpur News