मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; 14 रानडुकरांच्या मृतदेहांचा खच

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; 14 रानडुकरांच्या मृतदेहांचा खच

समृद्धी महामार्ग (फाईल फोटो)

समृद्धी महामार्ग (फाईल फोटो)

मागच्या काही दिवसांमध्ये 100हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 10 जानेवारी : राज्यातील समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या घटनेत वाढ होत आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने 14 रानडुकरांना चिरडले आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात आजनगाव जवळ घडली. अपघातानंतर क्षतिग्रस्त वाहन घेऊनच वाहनचालक फरार झाला आहे. यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने रानडुक्कर समृद्धी महामार्गावर आलेच कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

समृद्धी महामार्गाचे दोन्ही बाजूला संरक्षण भिंत असून वन्यप्राणी समृद्धी महामार्गावर येऊ शकणार नाही, असा दावा केला गेला होता. त्यामुळे काल रात्री अंजनगाव जवळ रानडुकरांचा कळप समृद्धी महामार्गावर कसा आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - वाहतुकीचे नियम पाळा आणि शॉपिंगमध्ये सूट मिळवा! नागपुरात सुरू होतोय भन्नाट उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 11 डिसेंबरला लोकार्पण करण्यात आलं. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा आहे. यानंतर मागच्या काही दिवसांमध्ये 100हून अधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांची कारणेही आता समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समृद्धी महामार्गावरून वाहने चालवताना अतिदक्षता घेण्याची गरज आहे.

First published:

Tags: Accident, Nagpur News, Road accident