मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : सर्वांच्या डोळ्यासमोर स्कार्पियोला जलसमाधी! वाहनात 5 ते 6 लोक असण्याची शक्यता

Video : सर्वांच्या डोळ्यासमोर स्कार्पियोला जलसमाधी! वाहनात 5 ते 6 लोक असण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात एक चारचाकी गाडी वाहून गेली.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात एक चारचाकी गाडी वाहून गेली.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुराच्या पाण्यात एक चारचाकी गाडी वाहून गेली.

  • Published by:  Rahul Punde
नागपूर, 12 जुलै : राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लोकांच्या डोळ्यासमोर एक वाहन पुराच्या पाण्यात वाहून जात होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे घटना? गेल्या दोनतीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. त्यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नांदागोमुख मार्गावरील पुलावरुन स्कार्पियो वाहन वाहुन गेल्याची घटना घडली. यात 5 ते 6 प्रवासी पुरात वाहून गेल्याची माहिती पुढे येत आहे. ही घटना दुपारी 3 वाजता घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कार्पियो गाडीत काही लोक असल्याचे पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत (Rain in Maharashtra) असल्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. तर काही ठिकाणी याच मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. (Rain Situation in Maharashtra) शेतामध्ये तळ्याचं रुप झाले आहे. यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. (Yawatmal Rain Update) शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर शेतात 2 ते 3 फूट पाणी साचले आहे. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने वारा रोडवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तर नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. (Nanded Rain Update) त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. विष्णुपुरी धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि वरच्या भागातदेखील पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा ओघ वाढला आहे. आवक वाढल्याने विष्णूपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.
First published:

Tags: Nagpur News, Rain fall

पुढील बातम्या