मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शाळेत जाणारी स्कुल व्हॅन नाल्यात कोसळली, दोघांची प्रकृती गंभीर, 14 विद्यार्थी थोडक्यात बचावले

शाळेत जाणारी स्कुल व्हॅन नाल्यात कोसळली, दोघांची प्रकृती गंभीर, 14 विद्यार्थी थोडक्यात बचावले

 नाल्यात व्हॅन कोसळल्यानंतर तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आले. पण, दोन मुलांच्या नाका तोंडात पाणी गेले

नाल्यात व्हॅन कोसळल्यानंतर तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आले. पण, दोन मुलांच्या नाका तोंडात पाणी गेले

नाल्यात व्हॅन कोसळल्यानंतर तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आले. पण, दोन मुलांच्या नाका तोंडात पाणी गेले

नागपूर, 08 ऑगस्ट : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या एका स्कुल बसला अपघात झाला आहे. अपघातानंतर स्कुल व्हॅनही (school van accident) नाल्यात कोसळली. त्यामुळे पाणी नाका तोंडात गेल्यामुळे 2 विद्यार्थ्यांची परिस्थितीत गंभीर आहे. तर 14 विद्यार्थ्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील बेल तरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला. आज सकाळी नेहमीप्रमाणे पोद्दार स्कुल बेसा शाळेतील (podar school nagpur) विद्यार्थ्यांना घेऊन मिनी स्कुल व्हॅन शाळेकडे चालली होती. बेसा घोगली रोडवर व्हॅन पोहोचली असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे स्कुल व्हॅन रस्त्याच्या खाली उतरली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली. (TET Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या 2 मुलींचंही नाव, प्रमाणपत्र रद्द) आधीच पाऊस सुरू असल्यामुळे नाल्याला पाणी जास्त होतं. नाल्यात व्हॅन कोसळल्यानंतर तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आले. पण, दोन मुलांच्या नाका तोंडात पाणी गेले आहे. त्यामुळे दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त व्हॅनला बाहेर काढण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये एकूण 16 विद्यार्थी होते. त्यापैकी दोघांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात दरम्यान, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एक वित्रित अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई लेनवर खोपोलीच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाला ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात ट्रकमधील एक प्रवासी ठार झाला. तर या अपघातग्रस्त उभ्या असलेल्या ट्रकला एका कारने ठोकर मारली. त्यामुळे कार चालक किरकोळ जखमी झाला. यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीची रेस्कु टीम, महामार्ग पोलीस आणि देवदूत यंत्रणा दाखल झाली. मृत प्रवाशाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या