नागपूरमध्ये आंदोलनाला गालबोट नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नागपूरच्या जीपीओ चौकात सुरू होते त्यावेळी ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे आंदोलनाची चर्चा घडवून आणण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भंगार मधून ती कार उचलून आणली व आंदोलन स्थळी पेटवून दिली. त्यामुळे सत्याग्रहाच्या नावावर नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचीच प्रतिमा मलीन केल्याची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांनी कुणाल राऊतसह इतर कार्यकर्त्यांना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त संदीप पखाले यांनी दिली आहे. नागपूरच्या जीपीओ चौकामध्ये जळणारी ही कार रस्त्यावरची धावती कार नसून भंगार मधून उचलून आणलेली जुनी कार आहे. त्याला साधं इंजनही नव्हतं. कुणाल राऊत यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून स्टंटबाजी करण्याच्या उद्देशाने या कारला काही तासांआधीच रस्त्याच्या कडेवर आणून ठेवली होती. सर्वाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी कुणाल राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कारला ढकलत चौकात आणले. त्यानंतर कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कारला पेटवून दिले. अचानक घडलेल्या या प्रकाराबद्दल पोलिसांनाही कोणती कल्पना नव्हती. त्यामुळे काही वेळेसाठी या परिसरात भीतीचे वातावरण पसरले अग्निशमन विभागाने वेळीच पोहोचून जडणाऱ्या या भंगाच्या कारला विझवले कुणाल राऊत हे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र आहे. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध म्हणून देशभर, राज्यभर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन केले जात होते. नागपूरच्या संविधान चौकात सकाळी 11 वाजता पासून मुख्य संपूर्ण राज्यभर अत्यंत शांत प्रिय पद्धतीने सुरू होते. कुणाल राऊत यांच्या या चमकोगिरीच्या कृतीमुळे काँग्रेस पक्षाचे प्रतिमा मलीन झाली आहे. निदान आपल्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांच्यासाठी आंदोलन करताना कुणाल राऊत यांनी थोडे तरी तारतम्य बाळगायला हवे होते. त्यामुळे आता काँग्रेस पक्षातूनच याचा निषेध होत असून कोणाला राऊत यांच्यावर कारवाई केली जाईल असे काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे. भाजपने देखील कुणाला यांच्या या कृतीच्या निषेध केला. या निंदनीय कृतीनंतर पोलिसांनी कुणाल राऊत याला अटक केली. मात्र, कुणाल राऊत यांनी केलेल्या स्टंटबाजीमुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. त्यामुळे कुणाल राऊत यांनी ही स्टंटबाजी का केली? व कशासाठी केली? याचे उत्तर अजून तरी त्यांनी दिले नाही.Video : काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला नागपूरमध्ये गालबोट! #Congress #Satyagraha #SoniaGandhi pic.twitter.com/x7ndSaOEWz
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Sonia gandhi, काँग्रेस