नागपूर, 09 डिसेंबर : सर्व बाजूंनी झगमगणारं हे वर्तुळ... नेत्रदीपक असं हे दृश्य... सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. पण हे नेमकं आहे तरी काय? हे नेमकं काय आहे हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओतील दृश्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर चक्क समृद्धी महामार्ग आहे.
हो बरोबर... नागपुरातील समृद्धी महामार्ग. 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचं लोकार्पण करणार आहेत. त्याआधी या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समृद्धी महामार्ग नेमका दिसतो कसा, तर हा असा. समृद्धीचं रात्रीच्या वेळेचं हे सुंदर दृश्य. अगदी नावाप्रमाणेच समृद्ध असा हा महामार्ग दिसतो आहे.
हे वाचा - आव्हानात्मक नोकरीसाठी कोर्टात जाऊन लढली, देशातील पहिली 'लाईनवुमन' ठरली शिरीषा
राज्यातल्या सर्वात मोठा चौक आणि समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू. तब्बल 18 एकरात विस्तारलेला आणि सुमारे 1 किलोमीटरची परिक्रमा असलेला समृद्धी महामार्गाचा झिरो माइल्स रात्री विविध रंगांच्या लाईट्सने आणखी सुंदर,नेत्रदीपक दिसतो. 73 प्रकारच्या विविध रंगी विद्युत दिव्यांचा वापर करण्यात आला आहे.
हे लाईटस झिरो माईल चौकावर लावलेल्या सोलार ट्रीजमधून निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेवर आहेत. या चौकावरच आठ किलो वॅट सौर ऊर्जेचे रोज उत्पादन केलं जातं. चौकाच्या अवतीभवती 90 विद्युत पोल आणि दीड हजार पेक्षा जास्त विद्युत दिवे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Viral, Viral videos