मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /समृद्धी महामार्गावर वॅगनारची ट्रकला धडक, डॉक्टर मैत्रिणींसह तिघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर वॅगनारची ट्रकला धडक, डॉक्टर मैत्रिणींसह तिघांचा मृत्यू

ट्रकला भरधाव वॅगनार कारने मागून धडक दिलीय. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झालाय.

ट्रकला भरधाव वॅगनार कारने मागून धडक दिलीय. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झालाय.

ट्रकला भरधाव वॅगनार कारने मागून धडक दिलीय. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झालाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नागपूर, 02 एप्रिल : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचंच दिसतंय. महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले असून त्यात प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर भीषण अपघात झाला. ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिलीय. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झालाय.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाबळा परिसरात शनिवारी रात्री साडे बारा वाजता भीषण अपघात घडला. यात डॉक्टर ज्योती क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम ),डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार -अमरावती ), भरत क्षीरसागर (राहणार. मालेगाव, जिल्हा -वाशीम ) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केलीय.

फलक लावण्यावरून वाद, पाठीत खुपसलेल्या चाकूसह तरुण पोहोचला रुग्णालयात 

समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचाजागीच मृत्यू झालाय. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे.नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यात आलीय. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिलीय. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले.

First published:
top videos

    Tags: Nagpur