मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच, भीषण अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृत्यू

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिकाच, भीषण अपघातात चिमुकलीसह महिलेचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एक महिला आणि लहान मुलगीचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एक महिला आणि लहान मुलगीचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एक महिला आणि लहान मुलगीचा समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

किशोर गोमाशे (वाशिम) 28 डिसेंबर : अवघ्या दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात उदघाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी याच महामार्गावर मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एक महिला आणि लहान मुलगीचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरात हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कारंजा परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतकांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. नागपुरच्या दिशेने जाणारी कार पलटी होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा : जेव्हा प्रेम भयानक रूप धारण करतं; प्रियकरानं गर्लफ्रेंडला जमिनीवर पाडून बेशुद्ध होईपर्यंत लाथांनी मारलं

दरम्यान ही घटना आज (दि.28) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. कार समोर एखादा जंगली प्राणी आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. कारमधील प्रवासी हो नागपूरचे असल्याचे सांगण्यात आले.

मागच्या 24 तासांत दुसरी घटना

समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले, त्यामुळे गाडी चार वेळा पलटी झाली. अखेर विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन धडकली, ही घटना सोमवारी लासूर स्टेशन जवळ घडली. सुदैवाने या अपघातात कार मधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की (MH 31 EK 1362) या कारमधून एक कुटुंब शिर्डी येथून नागपूरकडे जात होते. या गाडीमध्ये दोन पुरुष, दोन महिला व लहान मुले होती. दरम्यान लासूर स्टेशन जवळ आल्यावर चालकाने गाडीचा वेग वाढवला.

हे ही वाचा : औरंगाबाद : आईवडील खर्चाला पैसे देत नाहीत म्हणून दोघांचं भयानक कृत्य, वाचून बसेल धक्का

काही किलोमीटर अंतर सुसाट वेगात काढल्यावर पुढे पोटुळ जवळ आल्यावर अति वेगात असल्याने अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचे टायर फुटल्याने भरधाव वेगातील गाडी चार वेळा पलटी झाली. गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन धडकली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजू गांवातील लोकांनी महामार्ग परिसरात धाव घेतली.

First published:

Tags: Accident, Major accident, Nagpur, Nagpur News