नागपूर, 20 मार्च : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी रेशीमबागेला भेट दिली. समीर वानखेडे हे रेशीमबागेत गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. समीर वानखेडे यांनी रेशीमबागेत जाऊन हेडगेवार यांच्या स्मृतीचं दर्शन घेतलं. समीर वानखेडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील स्मृती मंदिरात पोहोचल्यानं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
हेडगेवारांच्या समाधीला अभिवादन
समीर वानखेडे यांनी आज सपत्निक रेशीमबागेला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीला अभिवादन करून फुलं वाहिली. दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्हिजीट बुकवर मनोगतही व्यक्त केलं आहे. समीर वानखेडे अचानक रेशीमबागेत पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी आहेत. मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते. या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. याच प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. मात्र या प्रकरणात जात पडताळणी समितीकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली.
राज, राणे ते मनोहर जोशी, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं सगळंच बाहेर काढलं!
काय आहे मलिकांचा आरोप?
समीर वानखेडे हे हिंदू महार नाही तर मुस्लीम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद आहे की ज्ञानदेव? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. तसेच जातीचे खोटे पुरावे देऊन समीर वानखेडे हे केंद्र सरकारच्या सेवेत दाखल झाल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. मात्र या सर्व प्रकरणात समीर वानखेडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RSS