मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नागपूरच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याचं भन्नाट वादन, तुम्हीही म्हणाल वा, क्या बात है!

Video : नागपूरच्या 3 वर्षाच्या चिमुकल्याचं भन्नाट वादन, तुम्हीही म्हणाल वा, क्या बात है!

सोशल मीडियावर सध्या चिमुकल्याचा ताशा वादनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या चिमुकल्याचा ताशा वादनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर सध्या चिमुकल्याचा ताशा वादनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अगदी खेळण्या बागडण्याचा वयात या मुलाने ही कला पारंगत केलीये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 7 ऑक्टोबर : ढोलाचा ठोका आणि ताशाची तर्री पडली की अनेकांचेच पाय ठेका धरू लागतात. लयबद्ध आणि शिस्तबद्ध वादनामुळे वातावरण मंत्रमुग्ध होतं. मात्र, ताशावर तर्री वाजवणे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. यासाठी वादनाची विशिष्ट कला अवगत करणे आवश्यक आहे. अशीच कला अगदी खेळण्या बागडण्याचा वयात पारंगत केलीये नागपूरच्या एका चिमुकल्याने. सोशल मिडियावर सध्या चिमुकल्याच्या वादनाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

ढोल-ताशा, संबळ, हलगी इत्यादी आपल्या समृद्ध संस्कृतीची पारंपारिक रणवाद्ये आहेत. यांच वाद्यांच्या गुजरात महाराष्ट्राने विजयाचा डौल पाहिला, तर कधी नगारखाने दुमदुमून सोडले. याच संस्कारांच्या प्रेरणेतून मराठमोळी संस्कृतीची जोपासना झाली आणि ढोल ताशांच्या पथकांच्या रूपाने सर्वत्र ही संस्कृती फोफावली. ढोलताशांच्या गजराने मराठी मन थिरकले नाही असे उदाहरण शोधून सापडणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल

ढोल ताशांच्या पथकांच्या माध्यमातून अनेक आनंददायी अनुभव पुढे येत असतात. त्यातीलच एक प्रसंग म्हणजे नागपुरातील अवघ्या 3 वय वर्ष असलेला ताशा वादक साई रितेश बळवाईक. त्यांच्या अप्रतिम  ताशा वादनाच्या स्टाईलने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. सध्या साईचे वादन सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. 

खेळण्यातच केला ताशाचा समावेश

संस्कारातून मुलं घडत असतात, 'पेरलं तेच उगवतं' या उक्तीचा प्रत्यय साईचे वादन बघितल्यानंतर होतो. वय वर्ष अवघे 3 असलेला साई अगदी मुरलेल्या वादकांप्रमाणे वादन करतो. त्यांचे अप्रतिम वादन बघून त्याने सर्वांना थक्क करून सोडला आहे. आईवडील दोघेही ढोल ताशा पथकात सक्रिय वादक होते. त्यामुळे घरातील वातावरणात कायम ढोल ताशाचा नाद असायचा. आपल्या पाल्याने देखील वादन करावे, अशी साईच्या आई वडिलांची देखील इच्छा होती. त्यासाठी त्यांनी साईच्या खेळण्यात इतर खेळण्याप्रमाणे खेळण्यातील ताश्याचा समावेश करून ताशाशी ओळख करून दिली.

Nashik :18 व्या वर्षीच बनली अनाथांची ताई, प्रेरणादायी प्रवास वाचून वाटेल अभिमान! Video

 15 पेक्षा अधिक मिरवणुकीत सहभाग

आईबाबांना ढोल ताशात वादन करताना बघून साईने हे सारे डाव हेरले आणि आपण देखील वाजवण्याचा सराव सुरू केला. खेळण्या खेळण्यात गंमत म्हणून वादन करणारा साई आज अल्पावधीतच एखाद्या कसलेल्या ताशा वादक प्रमाणे वाजवत असल्याचे पाहून सारेच थक्क होत आहेत. साई मोठ्या मोठ्या मिरवणुकीत ताशा वाजवून सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे. मागील गणपती, दुर्गादेवी उत्सवात साईने 15 हून अधिक मिरवणुकीत सहभाग घेतला. 

आई वडिलांची साथ

साईकडे बघून इतर लहान मुलांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासोबतच आपल्या संस्कृतीचा भाग असलेले संस्कार द्यायला हवेत, अशा भावना साईचे वडील रितेश बळवाईक आणि आई बरखा बळवाईक यांनी व्यक्त केल्या. हल्ली कॉम्प्युटर, मोबाईलच्या जगात आपल्या पाल्याची संस्कृतीशी नाळ जोडून संस्कारांचे बीजारोपण करणाऱ्या या आई वडिलांचं देखील या निमित्तानं कौतुक होत आहे.

First published:

Tags: Nagpur, Nagpur News, Social media viral, नागपूर