मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : वाघ, बिबट्यांसह पाहा वन्य प्राणी! महाराजबागेत वाढली पर्यटकांची गर्दी

Video : वाघ, बिबट्यांसह पाहा वन्य प्राणी! महाराजबागेत वाढली पर्यटकांची गर्दी

जंगलात मुक्तपणे संचार करणारे प्राणी, पक्षी महाराजबागेत पाहायला मिळतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 19 नोव्हेंबर : नागपूर  शहराच्या केंद्रस्थानी असलेले महाराजबाग प्राणी संग्रहालय शहरातील सर्वात जुने संग्रहालय आहे. नागपुरात येणाऱ्या पर्यटक आणि बच्चा कंपनीसाठी हे आकर्षणाचे केंद्र आहे. एरवी जंगलात मुक्तपणे संचार करणारे प्राणी, पक्षी येथे पाहायला मिळतात. या प्राण्यांना पाहण्यासाठी पर्यटक, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी सहली इथे येतात.

सध्या शाळकरी मुलांच्या सहलीचा हंगाम सुरू झाला आहे. महाराजबाग येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वन्य प्राणी, पक्षी पाहण्यासाठी येथे येत आहेत. हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर, विविध जातींचे असंख्य मोठे वृक्ष, जैव विविधता, पशू पक्षी इत्यादीसह शहरातील गजबजलेल्या भागात महाराजाबाग आहे. गर्दीच्या ठिकाणी असून देखील या बागेत नीरव शांतता असते ही विशेष बाब आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात जैवविविधता, निसर्ग, पशुपक्षी, वन्यजीवन, झाडे इत्यादींचा अंतर्भाव असल्याने शैक्षणिकदृष्ट्या महाराजबाग हे सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे. दरवर्षी या प्राणी संग्रहालयात 400 ते 500 शाळेतील सहली भेट देतात. यंदा सुद्धा अनेक शाळेची सहल याठिकाणी येत असून इतर पर्यटकांची देखील दररोज रेलचेल सुरू आहे.

शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी!

विद्यार्थ्यांसाठी सवलत

विशेषतः सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या अधिक असते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने निसर्गाबद्दल आणि पशुपक्ष्यांबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी महाराजबाग प्राणी संग्रहालयाकडून अनेक शाळांना कायम प्रोत्साहन दिले जाते. इथे भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलती दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात येतात. यासह आपल्याकडे असलेल्या स्टाफ त्यांना माहिती दर्शक म्हणून गाईड स्वरूपात देखील पुरवण्यात येतो. महाराज बागेत आज घडीला वाघ, बिबट्या, मगर ,अस्वल, मोर, हरण, नीलगाय इत्यादीसह विविध जातीचे पशुपक्षी आहेत.

वेळ आणि तिकीट दर

वन्य प्राणी व्यतिरिक्त नर्सरी आणि नर्सरीत होणारे काम कसे असते, याबद्दल देखील येथे मार्गदर्शन तज्ञांद्वारे करण्यात येते, अशी माहिती महाराजबागचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली. महाराजबागेला भेट देण्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 ही वेळ आहे. वयस्कर व्यक्तीसाठी 30 रुपये आणि विद्यार्थ्यांसाठी 15 रुपये असे येथील तिकीट दर आहेत.

First published:

Tags: Local18, Nagpur