नागपूर, 8 डिसेंबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विविध विषयांवर संवाद साधला ते नागपूरमध्ये तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग समापन समारोहात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, हिंदू कोण याचं उत्तर जो भारतावर प्रेम करतो. भारतीय संस्कृतीच्या सोबत चालतो. त्याचं खान पान पूजा पद्धती कुठलीही असो पण जो भारत एक मानतो, तो उत्तरदायी आहे तो हिंदू आहे. आमचं राष्ट्रीय चरित्र म्हणजे जगाला सुख आणि आनंद देणाऱ्या जीवन पद्धतीचा अवलंब करणे होय. त्यासाठी आपलं राष्ट्र मजबूत करावं लागेल. आजही भारत तुटावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भाडंण लावण्याचं काम सुरू असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
एकता निर्माण झाली पाहिजे
ते पुढे बोलताना म्हणाले की, भारताला आत्मनिर्भर बनवाव लागेल. जे प्रासंगिक आहे ते स्वीकार करावं लागेल, यातूनच भारत पुढे जाईल. देशात भिन्नता असली तरी आपण एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा हे सगळ शक्य होईल तेव्हा संघ हे नाव देखील हटवलं जाईल.समजाने आपल काम करावं म्हणून संघ आहे. समाज काम करेल तर संघ मागे जाईल असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मी प्रचाराला गेलो होतो तेव्हाच...; फडणवीसांनी सांगितलं गुजरात निवडणुकीच्या विजयाचं रहस्य
'भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी पुढे या'
आज भारताचा आत्मविश्वास इतका उंचावला आहे की, भारत 'जी 20' चं अध्यक्षपद भूषवत आहे, हे काही कमी नाही. भारताला जर विश्वगुरू बनवायचे असेल तर संपूर्ण समाजाने पुढे यायला हवं. भारत हा विश्वाला जोडणार महामार्ग असल्याचं अनेक देशांनी मान्य केलं आहे. जगाला सुखी करण्यासाठी ऋषी मुनींनी तप केलं आणि आज त्यातूनच आपल्याला मार्ग दिसत असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.