नागपूर, 28 नोव्हेंबर: नागपुरातील (Nagpur) नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रूरतेच्या परिसीमा गाठणारी घटना समोर आली आहे. येथील एका निवृत्त महिला डॉक्टरची काही अज्ञातांनी निर्घृण हत्या (Retired woman doctor brutal murder) केली आहे. नराधम आरोपींनी मृत महिलेला खुर्चीला बांधून तिच्या तोंडावर चिकटपट्टी लावून तिचा गळा कापला (Slit throat) आहे. संबंधित घटना नंदनवन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
देवकीबाई जीवनदास बोबडे असं हत्या झालेल्या 78 वर्षीय निवृत्त डॉक्टर महिलेचं नाव असून त्या नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली मुलगी आणि जावयासोबत वास्तव्याला आहेत. दरम्यान शनिवारी रात्री सातच्या सुमारास त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वयोवृद्ध महिलेला निर्घृण पद्धतीने संपवल्याने घरातील चित्र पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. लुटमारीच्या उद्देशातून अज्ञात आरोपीनं ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-पुतण्या पेटवून घेत होता अन् चुलता पाहतच राहिला; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला डॉक्टर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायत्री कॉन्व्हेंट परिसरात आपली मुलगी आणि जावयासोबत वास्तव्याला होत्या. त्यांची मुलगी आणि जावई देखील पेशाने डॉक्टर आहेत. त्यामुळे दोघंही शनिवारी सकाळी आपल्या कर्तव्यावर गेले होते. यावेळी 78 वर्षांच्या देवकीबाई घरी एकट्याच होत्या. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत देवकीबाई यांची निर्घृण हत्या केली आहे.
हेही वाचा-पुण्यात 52 वर्षीय व्यक्तीचं शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; आधी कारमध्ये बसवलं मग
नराधम आरोपीनं वयोवृद्ध देवकीबाई यांना खुर्चीला बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून गळा कापला आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.