Home /News /maharashtra /

सर आली धावुन अन्...; पावसामुळे आनंदले मात्र महाराष्ट्रातील 3 शेतकऱ्यांनी गमावला जीव

सर आली धावुन अन्...; पावसामुळे आनंदले मात्र महाराष्ट्रातील 3 शेतकऱ्यांनी गमावला जीव

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

यातील एका शेतकऱ्याचं 10 दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. संसार सुरू होतो न होतो तोच....

जलालखेडा, 18 जून : शनिवारी दुपारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा (Three farmers killed in lightning strike) व एका बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला. हिवरेमठ (Nagpur News) येथील योगेश रमेश पाठे वय वर्ष 27 या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू (Farmer death) झाला आहे. शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास शेतात पेरणी करत असताना पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या मोटार सायकलजवळ पोहचला असता अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. योगेशचे 10 दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्याला वडील नसून तो मोठा भाऊ व आईसोबत राहत होता. त्याच्याकडे 5 एकर शेती आहे. (Three farmers death in lightning) तर मुक्तपुर शिवारात शेतातील झोपडीत बसून असलेल्या दोन शेतकऱ्यांचा झोपडीवर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू असल्यामुळे दिनेश ज्ञानेश्वर कामडी वय वर्ष 34, बाबाराव मुकाजी इंगळे वय वर्ष 60 दोघेही रा. मुक्तापुर शेतात असलेल्या झोपडीत बसले होते. विजेचा कडकडाट सुरू असताना अचानक एक वीज त्या झोपडीवर पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिनेशचे 5 महिन्यापूर्वी लग्न झाले होते. इतका वेळ झाला तरी मुलगा शेतातून परत आला नाही, म्हणून वडील शेतात पाहायला गेले असता हे दोघेही शेतातील झोपडीत पडून होते. ते काही प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी ही माहिती गावातील नागरिकांना दिली असता दोघांचाही वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तालुक्यातील पिपंळगाव (राऊत ) शिवारमध्ये भिष्णुर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी 3 च्या सुमारास वीज पडून बैलजोडीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सभापती नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी भेट दिली व तहसीलदार जाधव  यांना पूर्ण माहिती देऊन त्वरित मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तिन्ही ठिकाणी झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मनोज चौधरी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदन गृहात पाठवला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Nagpur News

पुढील बातम्या