Home /News /maharashtra /

शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं

शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं

नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार जरी असले तरी शिवसेना (Shivsena) समर्थित आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. बंडखोरीनंतर आमदार भोंडेकर शिंदे गटात गेले आहेत.

    नेहाल भुरे, भंडारा, 26 जून : भंडारा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष व शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर (Mla Narendra Bhondekar) यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा शहरात चौकाचौकात मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले असून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात येत आहे. नरेंद्र भोंडेकर हे सध्या शिंदे गटासोबत (Eknath Shinde) गुवाहाटी येथे मुक्कामी आहेत. भोंडेकर हे मतदार संघात अनुपस्थित असले तरी कार्यकर्ते मात्र जोमात असून मोठा उत्साह दिसून येत आहे. नरेंद्र भोंडेकर हे अपक्ष आमदार जरी असले तरी शिवसेना (Shivsena) समर्थित आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. बंडखोरीनंतर आमदार भोंडेकर शिंदे गटात गेले आहेत. सरकार स्थापनेसाठी वेळ लागत असल्याने गुवाहाटीत भोंडेकरांचा मुक्काम वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडून CM पदाची ऑफर, आदित्य यांचं आक्रमक भाषण; पक्ष वाचवण्यासाठी आता रश्मी ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू... मंत्रिपदासाठी साकडे भाजप-शिंदे युतीतून तयार होणाऱ्या सरकारमध्ये भोंडेकर यांना मंत्रीपद मिळवं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी भोंडेकरांच्या वाढदिवसाच्या दिवशी पवनी येथे हनुमान चरणी घातले साकडे घातले. राज्यपाल लागले कामाला, एकनाथ शिंदे गटासाठी पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र बंडखोरांच्या बायकादेखील त्यांच्यासोबत राहणार नाहीत हिंगोलीतील शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना उद्देशून भलताच संताप व्यक्त केला. शिवसेनेतील बंडखोरांसोबत त्यांच्या बायका देखील राहणार नाहीत, असं वक्तव्य बांगर यांनी केलं. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या बदमाषांचा आता भरवसा राहिला नाही. या बंडखोर आमदारांच्या बायका देखील त्यांना सोडून जातील, त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांची मुलं मुंजेच मरतील, त्यांची लग्न होणार नाहीत. अशा बेईमानांच्या मुलांना कोण मुली देणार? असं वक्तव्य शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी केलं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या