मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे, मनसेच्या रणनितीमुळे भाजप युतीला ब्रेक?

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे, मनसेच्या रणनितीमुळे भाजप युतीला ब्रेक?

Raj Thackeray Devendra Fadanvis

Raj Thackeray Devendra Fadanvis

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. विदर्भामध्ये मनसे पक्षाची बांधणी करण्यासाठी राज ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत.

  • Published by:  Shreyas
नागपूर, 14 सप्टेंबर : मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. विदर्भामध्ये मनसे पक्षाची बांधणी करण्यासाठी राज ठाकरे नागपूरमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारीही मुंबईहून नागपूर दौऱ्यासाठी आले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आगामी महापालिका निवडणुकीबाबतची मनसेची रणनिती सांगितली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसे सर्व जागांवर लढणार आहे, तशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत, यासाठी आमची तयारी सुरू आहे. विदर्भातदेखील आम्ही सर्व महापालिकांमध्ये सर्व जागा लढवणार आहोत. लवकरच होणाऱ्या सगळ्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसे सगळ्या जागा लढणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे, त्यामुळे मनसेची भाजपसोबत युती होणार नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. या भेटीगाठींमुळे भाजप-मनसे युती होण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहेत, पण आता मनसेकडून सर्व महापालिकांच्या सर्व जागा लढवण्याची तयारी सुरू झाल्याने युतीच्या चर्चांना ब्रेक लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद सुरू आहेत. पण दसरा मेळावा कोण आणि कुठे घेतो, त्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार कोण पुढे नेतो, हे महत्त्वाचं आहे. राज ठाकरे नेते आहेत, असं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं. महाराष्ट्राबाहेर उद्योग जात आहेत, यावर राजकारण करण्याची गरज नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हितासाठी काम करावं, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
First published:

Tags: MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या