मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फटाके फोडल्याने राहुल गांधी संतापले

शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात विरोधकांनी फटाके फोडल्याने राहुल गांधी संतापले

राहुल गांधी श्रद्धांजली साठी उभे राहतील तेवढ्यातच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली.

राहुल गांधी श्रद्धांजली साठी उभे राहतील तेवढ्यातच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली.

राहुल गांधी श्रद्धांजली साठी उभे राहतील तेवढ्यातच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana (Buldhana), India
  • Published by:  Khushalkant Dusane

बुलढाणा, 19 नोव्हेंबर : सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात आहे. काल 18 तारखेला राहुल गांधींची शेगाव येथे सभा पार पडली. यानंतर बुलढाणा येथील भारत जोडो यात्रेतील राहुल गांधींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात एक धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात विरोधकांनी फटाके फोडले. या प्रकारामुळे विरोधकांवर चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळालं.

काय आहे संपूर्ण घटना -

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आहे. या ठिकाणी भास्तन गावात तीन कृषी कायदे परत घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं. त्यामध्ये तब्बल 733 शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागला. या संपूर्ण 733 शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव दाखवत जळगाव जामोद तालुक्यात भास्तन येथे शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मात्र, राहुल गांधी श्रद्धांजली साठी उभे राहतील तेवढ्यातच विरोधकांनी फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. यावेळी तत्काळ निवेदकाकडून फटाक्यांची आतिषबाजी हा नियोजित कार्यक्रमातील प्रकार नसल्याचे सांगत पोलिसांना फटाक्यांची आतिशबाजी करणाऱ्या विरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या आतिषबाजीचा निषेध करण्यात आला. यावेळी राहुल गांधीसुद्धा घडलेल्या या प्रकारामुळे विरोधकांवर चांगलेच चिडल्याचे पाहायला मिळालं.

हेही वाचा - भाजप, मनसे आक्रमक झाल्याने राहुल गांधी नरमले? शेगावच्या सभेत सावरकरांवर बोलणं टाळलं

सावरकर नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, काय म्हणाले राहुल गांधी? -

महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद उफाळला आहे. मनसेसह भाजपच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. दरम्यान आज शेगावमध्ये त्यांच्या जोडो भारत यात्रेचं शेवटचं भाषण होतं. यावेळी ते सावरकरांबद्दल काही बोलणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. दरम्यान यावेळी त्यांनी सावरकरांबद्दल काहीही बोलणं टाळलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात सावरकरांचा उल्लेख केलेला नाही. मात्र यंदा त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

शिवाजी महाराजांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, शिवाजी महाराजांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला रस्ता दाखवला. ते शिवाजी महाराज बनले यामागे त्यांच्या आई जिजामातांचा मोठा हात आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. त्यामुळे आज आपण त्यांचीही आठवण काढणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Maharashtra politics, Rahul gandhi