मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : लाल मिरचीचा ठसका कायम, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश

Video : लाल मिरचीचा ठसका कायम, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश

कळमना मार्केटमध्ये लाल मिरचीला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 19 नोव्हेंबर : कुठल्याही खाद्यपदार्थाला तिखट तडका देण्यासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या लाल मिरचीला यंदा अच्छे दिन आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या नागपुरातील  कळमना मार्केटमध्ये लाल मिरचीला समाधानकारक बाजार भाव मिळत आहे. यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  

बाजारात लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळत आहे. मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे सार्थक होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मागल्या वर्षीपेक्षा यंदा मिरची दरात 20-30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन वर्षापासून मिरची उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील मिरचीला चांगली मागणी मिळत आहे. 2019 नंतर चायना, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या मिरचीला कधी 100 रुपयांवर बाजार भाव नव्हता ती मिरची आत्ता 200-250 रुपयांपर्यंत विकली जात आहे.

  20-30 टक्के भाव वाढ 

सिंगल पट्टी व गुजराती मिरचीला लोकांची पसंती आहे. गुजराती लोक जे गोड जेवण पसंत करतात अशांसाठी या मिरचीची मोठी मागणी असते. या मिरचीला तेज पणा कमी असून दिसायला मात्र लाल दिसते. त्याही मिरचीची डिमांड अधिक असून आवक कमी आहे. यासह तेजा - 170 ते 220, चिखली बुलढाणा - 300 ते 400, चपाटा - 800-900 रुपये प्रति किलो प्रमाणे विकली जात आहे. मिरचीच्या किमतीमध्ये 20-30 टक्के वाढ झालेली आहे, अशी माहिती नागपूर मिरची असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष विनोद गर्ज यांनी दिली.

 चांगला बाजारभाव

मिरचीला चांगला  बाजार भाव मिळत असल्याने मागील तीन वर्षापासून मी मिरची उत्पादन करीत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे. महागाईच्या काळात चांगला बाजार भाव मिळाल्याने आमच्या कष्टाचा सार्थक होत आहे, अशी भावना मिरची उत्पादक शेतकरी उमेश नितनवरे यांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Local18, Nagpur