मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माझा पराभव जनतेनं नाही तर...; प्रकाश आंबेडकरांचं पु्न्हा ईव्हीएमकडे बोट

माझा पराभव जनतेनं नाही तर...; प्रकाश आंबेडकरांचं पु्न्हा ईव्हीएमकडे बोट

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana (Buldhana), India

बुलढाणा, 16 मार्च :  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. तसंच त्यांनी यावेळी बोलताना ईव्हीएमवर देखील शंका उपस्थित केली आहे. लोकांनी पाडण्यापेक्षा ईव्हीएममुळेच आपला पराभव झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांचा एक मार्फ केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं प्रकाश आंबेडकरांनी? 

प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. लोकांनी पाडण्यापेक्षा माझा पराभव ईव्हीएममुळेच झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. बारा मार्चपासून शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे. हा लॉंग मार्च आज मुंबईवर धडकणार आहे. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाल वादळ अनेकदा आलं , काही फरक पडला नाही. शेतकरी जोपर्यंत जात पाहून मतदान करेल तोपर्यंत शेतकऱ्यांनी कितीही मोर्चे काढले तरी काही फरक पडणार नाही. जात पाहून मतदान होत असेल तर मालाला भाव मागण्याचा नैतिक अधिकार शेतकऱ्याला नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनावर ठाम, मोर्चा मुंबईवर धडकणार; आज तरी तोडगा निघणार का?

शितल म्हात्रे प्रकरणावर प्रतिक्रिया  

दोन दिवसंपूर्वी शितल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशात महिलांचा अवमान करण्याची प्रथा खुलेआम चालू आहे. शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ ज्याने कोणी व्हायरल केला असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तासंघर्ष प्रकरणावर बोलताना सुप्रीम कोर्टाने नको तिथे हात घातला, हे त्यांचं कार्यक्षेत्र नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Prakash ambedkar