जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashta Politics : राष्ट्रवादीतील भूकंपानंतर नागपूरकरांची फडणवीसांना नवी उपाधी; जिल्हाभर लागले होर्डिंग्ज!

Maharashta Politics : राष्ट्रवादीतील भूकंपानंतर नागपूरकरांची फडणवीसांना नवी उपाधी; जिल्हाभर लागले होर्डिंग्ज!

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

कालच्या राजकीय भूकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरकरांनी नवी राजकीय उपाधी दिली आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

xनागपूर, 3 जुलै, उदय तिमांडे :  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं आहे. अजित पवार यांनी भाजप, शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान कालच्या राष्ट्रवादीमध्ये झालेल्या भूकंपानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरकरांनी नवी उपाधी दिली आहे. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे पोस्टर लागले आहेत.  होर्डिंग्जमध्ये काय?  कालच्या राजकीय भूकंपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरकरांनी नवी राजकीय उपाधी दिली आहे. महाराष्ट्राचा महाचाणक्य असा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख  होर्डिंग्जवर करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.  ‘महाराष्ट्राच्या हितासाठी दोन पक्षांना भाजपसोबत आणणाऱ्या देवेंद्रभाऊ तुमच्या चाणक्यनितीला सलाम’ असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. विशेष म्हणजे होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देखील छापण्यात आले आहेत. या पोस्टवर कमळ, घड्याळ आणि  धणुष्यबाण हे तिन्ही पक्षांचे चिन्ह एकत्र पहायाला मिळत आहेत.

Maharashta Politics : राष्ट्रवादीमध्ये गळती सुरूच; आणखी एक बडा नेता अजितदादांच्या गळाला

 अजित पवारांकडून चिन्हावर दावा  दरम्यान दुसरीकडे अजित पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्याच चिन्हावर लढवणार असल्याचं काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.  आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय आपण आगामी निवडणुका भाजप-शिवसेनेसोबत घड्याळ या चिन्हावरच लढवणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात