Home /News /maharashtra /

'ईनो' घेण्याऱ्यांनो सावधान! पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक प्रकार उघड

'ईनो' घेण्याऱ्यांनो सावधान! पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक प्रकार उघड

अमरावतीत लक्ष्मीनगरातील साक्षी ट्रेडर्स नावाच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. घनशाम हरीचंद्र लालवानी (वय 40, रा. मणीपूर लेआऊट, शोभानगर) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे.

    अमरावती, 23 जुलै : अनेकांना अॅसिडिटीचा त्रास जाणवतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून ईनो घेतात. मात्र, ईनो घेणाऱ्यांशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. अमरावतील जिल्ह्यात बनावट ईनो पाऊचची खुलेआम विक्री केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अमरावीमध्ये एका व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ईनो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने व्यावसायिकाला बनावट ईनो विकताना रंगेहाथ पकडले आहे. अमरावतीत लक्ष्मीनगरातील साक्षी ट्रेडर्स नावाच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. घनशाम हरीचंद्र लालवानी (वय 40, रा. मणीपूर लेआऊट, शोभानगर) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याच्या दुकानात 'ईनो'च्या बनावट पाऊचची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर नेट्रीका कन्सल्टींग प्रा. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने 'ईनो'चे अनेक बनावट पाऊच जप्त केले आहेत. या प्रकरणात मुंबई येथील नेट्रीका कन्सल्टींग इंडिया प्रा. ली. चे प्रतिनिधी विजय उत्तम पवार (४२) यांनी शुक्रवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी घनशाम लालवानीविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी कॉपी राईट कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. 'ईनो'चे बनावट पाऊच विकले जात असल्याची माहिती मुंबई येथील नेट्रीका कन्सल्टींग इंडिया प्रा. ली. चे प्रतिनिधी विजय उत्तम पवार (42) यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी साक्षी ट्रेडर्समध्ये जाऊन प्रथम 'ईनो'चे बनावट पाऊच विक्री होत असल्याची शहानिशा केली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. या माहितीवरून गुन्हे शाखेचे पथक व संबंधित कंपनी प्रतिनिधींनी लक्ष्मीनगरातील साक्षी ट्रेडर्सवर धाड टाकली. हेही वाचा - 'संभाजीनगर' नावावरुन विद्येच्या मंदिरातच राडा; शाळेच्या शिक्षिकेला शिवीगाळ दुकानातून 'ईनो'चे बनावट पाऊचचे 432 बॉक्स जप्त केले आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये 12 पाऊच आहेत. पोलिसांनी घनशाम लालवानीविरुद्ध कारवाई करत कॉपी राईट कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. जप्त करण्यात आलेला माल हा 2 लाख 33 हजार 280 रुपयांचा असल्याची माहिती आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Police, अमरावतीamravati

    पुढील बातम्या