मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! नागपुरात 21 लाख रुपये किंमतीची एमडी ड्रग्ज जप्त, तस्कर तरुणालाही अटक

मोठी बातमी! नागपुरात 21 लाख रुपये किंमतीची एमडी ड्रग्ज जप्त, तस्कर तरुणालाही अटक

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर होते. यावेळी एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला.

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर होते. यावेळी एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला.

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर होते. यावेळी एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  News18 Desk

नागपूर, 26 ऑगस्ट : नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये 21 लाख रुपये किंमतीची एमडी ड्रग्ज जप्त करणयात आली आहे. तसेच यासोबतच पोलिसांनी ड्रग्ज तस्कर तरुणालाही अटक अटक केली आहे. शुभम निलमवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई जरपटका पोलिसांनी केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

जरीपटका पोलीस परिसरात गस्तीवर होते. यावेळी एक संशयास्पद फिरणारा तरुण पोलिसांना पाहून पळू लागला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याची चौकशी केली असता हा तरुण एमडी तस्कर असल्याची माहिती समोर आली. यावेळी झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल 21 लाख रुपयांचे 213 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केले आहे. तसेच या तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रग्स तस्कर तरुणाचे नाव शुभम निलमवार असे आहे. त्याचे शिक्षण आयटीआय झाले आहे.

पोलिसांनी या तरुणाला अटक केली. तसेच त्याची चौकशी करताना त्याने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, त्याला ड्रग्जचे व्यसन होते. त्यामुळे यातूनच त्याची ओळख ड्रग तस्करांशी झाली. त्याला आपले व्यसन करायचे होते. ड्रग्स तस्करांशी ओळख झाल्यावर तो आपले व्यसनही पूर्ण करू लागला. तसेच आपले व्यसन पूर्ण करता करता तो स्वत:देखील या व्यवसायात उतरला. यानुसार त्याने मुंबईवरून एमडी ड्रगची खेप आणून नागपुरात विक्री सुरू केली होती.

हेही वाचा - लाथ लागल्याने धावत्या ट्रेनमधून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू, नागपूर-पुणे गरीबरथमधील घटना

पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यानंतर त्या कोणत्या टोळीशी संबंधित आहे, त्याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, नागपुरात गेल्या काही दिवसात ड्रग तस्करीचे प्रमाण वाढत आहे, असे पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.

First published:

Tags: Crime news, Drugs, Nagpur News