मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Omicron च्या म्युटेशननं वाढवली राज्याची चिंता, नागपुरात आढळले तीन Mutation

Omicron च्या म्युटेशननं वाढवली राज्याची चिंता, नागपुरात आढळले तीन Mutation

ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश (Sub-lineage) किंवा जाती (स्ट्रेन) आहेत. त्यातच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

नागपूर, 24 जानेवारी: काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा (Corona virus) प्रार्दुभाव (Outbreaks) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron variant) जगभरात धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश (Sub-lineage) किंवा जाती (स्ट्रेन) आहेत. त्यातच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूरमध्ये (Nagpur) आढळले ओमायक्रॉनचे 3 म्युटेशन आढळले आहेत....

नागपुरात ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन आढळून आले आहेत. निरी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. यानंतर नागपुरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

यात B.1.1. 529, B1, B2 या तीन म्युटेशनची नोंद झाली आहे. संशोधनाच्या चौथ्या टप्प्यात 89 नमुन्याची जिनोम सिक्वेन्सी करण्यात आली. त्यात 66.2 नमुना ओमायक्रॉनच्या B2 चे नमुने आढळले तर 31.5 टक्के B.1.1.529 चे आणि 2.3 हे B1 चे नमुने आढळले.

जगभरात Omicron च्या BA.2 स्ट्रेनचा कहर

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार युनायटेड किंग्डममधील आरोग्य अधिकारी BA.2 चा तपास करत आहेत. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश (Sub-lineage) किंवा जाती (स्ट्रेन) आहेत. त्यामुळे यूकेमध्ये कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या उप-वंशाचा तपास सुरु झाला आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने BA.2 ला तपासाधीन एक व्हेरिएंट म्हणून नियुक्त केलं आहे.

एकाच व्यक्तीला कितीवेळा Omicron ची लागण होऊ शकते; उत्तर सर्वांना आहे घाबरवणारं 

BA.2 ला अद्याप चिंतेचा व्हेरिएंट म्हणून नियुक्त केलेलं नाही. या घडामोडींशी परिचित असलेल्या लोकांनी रॉयटर्सला सांगितलं की, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या या उप-वंशामध्ये ओमायक्रॉनमध्ये दिसणारे विशिष्ट उत्परिवर्तन नाही आहे, ज्यामुळे डेल्टापासून ते सहजपणे वेगळे करणे कठीण होते.

Omicron च्या नव्या स्ट्रेनचा कहर

गेल्या आठवड्यातील वृत्तानुसार, डेली एक्सप्रेसच्या मते, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UK Health Security Agency UKHSA) ने यूकेमध्ये ओमायक्रॉनचे 53 सिक्वेंस ओळखले आहेत. UKHSA च्या नुसार, UK मध्ये Omicron च्या BA.2 स्ट्रेनची 53 प्रकरणे नोंदवली गेली होती.

अनेक देशांमध्ये BA.2 स्ट्रेन

इस्रायली अहवालानुसार, BA.2 स्ट्रेन आतापर्यंत अनेक देशांमध्ये पोहोचला आहे. डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, भारत आणि सिंगापूर येथे त्याचे प्रकार आधीच आढळले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंटचे तीन स्ट्रेन किंवा सब लीनिएज आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Nagpur, Omicron