नागपूर, 18 फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटले (Cloudy weather) आहेत. येत्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस धडकण्याची (Non seasonal rainfall) शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर (KS Hosalikar) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम वाया गेलं असताना, आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकंही धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
खरंतर सध्या उत्तर केरळपासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळात ईशान्यकडील वारे सक्रीय झाले आहेत. याचा एकंदरीत परिणाम म्हणून मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाड्यात परभणी, बीड, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-कोरोना संसर्ग दीर्घ काळ राहिल्यास गंभीर धोका, Heart Beat वर होऊ शकतो मोठा परिणाम
तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान याठिकाणी वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. येथील हवेचा वेग 20 ते 30 किमी प्रतितास इतका राहणार आहे.
•Under the influence of Western Disturbance; isolated light rainfall/snowfall very likely over Western Himalayan Region and isolated light rainfall likely over Punjab, West Rajasthan and Haryana-Chandigarh during next 24 hours.(5/8)
— India Meteorological Department (@Indiametdept) February 18, 2022
हेही वाचा-काय सर्वांना आहे कोरोना व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची आवश्यकता? लवकरच होणार निर्णय
याशिवाय मध्य आणि पूर्व भारतातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी 5 दिवसांत पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पाऊस पडेल. तसेच झारखंड, ओडिशा आणि बिहारमध्ये देखील 20-21 फेब्रुवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तरेत नव्याने धडकलेल्या पश्चिमी डिस्टर्बन्सेसमुळे हिमालय परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर येत्या चोवीस तासात पंजाब, पश्चिम राजस्थान, चंदीगड आणि हरियाणा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rainfall, Weather forecast, महाराष्ट्र