मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंदुत्वाच्या मुद्यावर कुणाला घाबरावयाचे नाही, मात्र.., मोहन भागवत स्पष्टच बोलले

हिंदुत्वाच्या मुद्यावर कुणाला घाबरावयाचे नाही, मात्र.., मोहन भागवत स्पष्टच बोलले

 आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही.

आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही.

आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  sachin Salve

नागपूर, 05 ऑक्टोबर : आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही. ज्यांना भीती वाटते त्या अल्पसंख्याक लोकांसोबत आम्ही संवाद साधत असतो, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे' असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसंच, 'परिस्थितीनुसार राष्ट्र विरोधी लोक वागतात, हे भोळे बनून येतात मात्र आपण त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे, असा सल्ला भागवत यांनी स्वंयसेवकांना दिला.

विजयादशमीला दरवर्षी साजरा होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिनाला संघ परिवारात अनन्य साधारण महत्त्व आहे. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. हा स्थापना दिवस अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी एक प्रमुख अतिथी बोलवले जातात. या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला संतोष यादव यांना बोलवण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं.

आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही. ज्यांना भीती वाटते त्या अल्पसंख्याक लोकांसोबत आम्ही संवाद साधत असतो, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे' असं मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. अलगाववाद हा विचार चुकीचा आहे. आम्ही समाज पंच जात यामध्ये विभागलो असलो तरी समाज म्हणून एक आहोत, असं भागवत यांनी ठणकावून सांगितलं.

राष्ट्र विरोधी लोकांवर प्रशासनाची कारवाई सुरू आहे. आपल्याला प्रशासनाला सहकार्य करून त्यांच्या सोबत उभे राहायचे आहे. परिस्थितीनुसार राष्ट्र विरोधी लोक वागतात, हे भोळे बनून येतात मात्र आपण त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे, असा सल्ला मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना दिला.

'मातृभाषेत शिक्षण घेण्यासाठी धोरण आले मात्र तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण द्याल तर मग धोरणाचा काय फायदा. तुमची सही, घरावरची प्लेट मातृभूमी ठेवत नाही मग धोरणाचा काय फायदा. फक्त इंग्रजीत शिक्षण घेतल्याने करिअर घडत नाही, मोठे लोक हे मातृ भाषेत शिकलेले आहे. शिक्षणासोबत इतर ज्ञान ही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.

(Dasara Melava : शिवसेनेमध्ये जे आजपर्यंत कधी घडलं नाही, ते आज घडणार!)

'पुढे जाण्यासाठी लवचिकता गरजेची असते. त्यातून प्रगती होते. सोबत सहचितता गरजेची असते. सनातन मूल्ये सोडून काम होत नाही. मात्र परिवर्तन आवश्यक आहे पण मूळ उद्देशापासून भटकणार नाही यासाठी सनातन मूल्यावर तुमचा पाय मजबूत असणे गरजेचे असते, असंही भागवत म्हणाले.

शक्ती प्रत्येक कामाचा आधार आहे. शांततेसाठी पण शक्तीची गरज असते. शक्ती साठी साधनेची गरज आहे. संपूर्ण समाजाला श्रेष्ठ बनवायचे असेल. तर स्त्री पुरुष असा भेदभाव करता येणार नाही. ती आमची संस्कृती राहिली आहे. हे सामाजिक दृष्ट्या पूरक आहे. महिलांना सक्षम करणे गरजेचे आहे. आपली काय विस्मृती झाली की, आपण त्याकडे दुर्लक्ष केले. मध्ययुगीन काळात सुरक्षेच्या नावावर महिलांना आपण दारांच्या आत ठेवले. पुढे ती परंपरा झाली. मातृशक्ती जे करू शकते ते पुरुष नाही करू शकत मातृशक्तीच्या जगरुतीचे काम आपल्या घरापासून सुरू करणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

(Dasara Melava : मुख्यमंत्र्यांची 'मोदी स्टाईल', दसरा मेळाव्यात पुन्हा ठाकरेंवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणार!)

जगात भारताची प्रतिष्ठा वाढत आहे. युक्रेन-रशिया युद्धावर भारत सरकारने जी भूमिका घेतली त्याचे मोहन भागवत यांनी कौतुक केले आहे. तसंच, कर्तव्य पथ संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले.

फक्त सरकारी नोकरीच्या पाठीमागे धावणे चुकीचे आहे. त्यामुळे फक्त 30 टक्के लोकांना नोकरी मिळेल. त्यामुळे रोजगारासाठी इतर पर्यायवर विचार व्हायला हवा. रोजगार निर्मितीसाठी आम्हाला सरकारला मुक्त करायचं नाही. तर लक्ष ठेवायचे आहे. रोजगार निर्मितीत समाजाची महत्वाची भूमिका आहे, असं मतही भागवत यांनी व्यक्त केलं.

'जनसंख्या वाढ याला समस्या म्हणून नाहीतर तरुण लोकसंख्या किती उपयोगी आहे हे महत्वाचे आहे. मात्र 50 वर्ष पुढचा विचार करून लोकसंख्या नियोजन करणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढीत पण समतोल गरजेचा आहे, असंतुलित लोकसंख्या वाढ ही राष्ट्र विघटनाला कारणीभूत ठरते. त्यामुळे असंतुलित लोकसंख्या वाढ व घुसखोरीमुळे जी लोकसंख्या अनियंत्रित पद्धतीने वाढत आहे. त्यावर कठोर कायदा येणे गरजेचे आहे व त्याची अंबलबजावणी कठोर पद्धतीने व्हायला हवे, अशी मागणीही भागवत यांनी केली.

First published:

Tags: Marathi news