मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...त्यांनी बायको सुद्धा पळवून आणली, नितीन गडकरींच्या फटकेबाजीने हास्यकल्लोळ, VIDEO

...त्यांनी बायको सुद्धा पळवून आणली, नितीन गडकरींच्या फटकेबाजीने हास्यकल्लोळ, VIDEO

'कार्यकर्ते हे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक झोकून देऊन काम करणारे असतात आणि दुसरे बोटाने मलम लावणारे असतात. हार घालण्यासाठी बरोबर पुढे येतात,

'कार्यकर्ते हे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक झोकून देऊन काम करणारे असतात आणि दुसरे बोटाने मलम लावणारे असतात. हार घालण्यासाठी बरोबर पुढे येतात,

'कार्यकर्ते हे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक झोकून देऊन काम करणारे असतात आणि दुसरे बोटाने मलम लावणारे असतात. हार घालण्यासाठी बरोबर पुढे येतात,

  • Published by:  sachin Salve
नागपूर, 13 ऑगस्ट: 'बावनकुळे यांची रिक्षाचालक म्हणून सुरुवात झाली. बाकी ते काही सांगत नाही, पण त्यांनी बायको सुद्धा पळवून आणली.  त्यांनी हे कसं केलं, ते खासगीत विचारलं तर सांगितलं. पण, यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भानगडीमध्ये पडू नये', असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी तुफान फटकेबाजी केली अन् सभागृहामध्ये एकच हश्शा पिकली. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा स्वागताचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थितीत होते. यावेळी गडकरींनी जोरदार टोलेबाजी केली. 'बावनकुळे यांची रिक्षाचालक म्हणून सुरुवात झाली. बाकी ते काही सांगत नाही, पण त्यांनी बायको सुद्धा पळवून आणली. त्यांची बायको ही कुणबी समाजाची आहे, ते तेली समाजाचे आहे. त्यांनी हे कसं केलं, ते खासगीत विचारलं तर सांगितलं. पण, यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी भानगडीमध्ये पडू नये, असं म्हणताच सभागृहामध्ये एकच हश्शा पिकली. 'कार्यकर्ते हे दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक झोकून देऊन काम करणारे असतात आणि दुसरे बोटाने मलम लावणारे असतात. हार घालण्यासाठी बरोबर पुढे येतात, फोटो काढताना बरोबर दिसतात पण मेहनत करत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचंड मेहनतीने काम केलं आहे. त्यांनी झोकून देऊन काम केलं. बावनकुळे हे आमदार झाले, मंत्री झाले, फडणवीस यांनी त्यांना ऊर्जाखाते दिले, त्यांनी चांगले काम केले, शेतकऱ्यांनी वीज पंप जोडून दिली, असं कौतुकही गडकरींनी केलं. (महाराष्ट्रातून धावणाऱ्या ‘या’ दोन ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, प्रवासापूर्वी वाचा) 'आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं आमदाराच्या पोटातून, खासदारांच्या पोटातून खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री कधी होत नाही. त्यांना सुध्दा अधिकार आहे. आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्या वडील गंगाधर फडणवीस यांच्या हाताखाली काम केलं. ते आजारी असताना त्यांनी कधीही राजकारणात संधी द्या, असं सांगितलं नाही. त्यांनी मला फडणवीस यांच्याशी बोलण्यासाठी सांगतील. फडणवीस हे राजकारणात आले आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर नगरसेवक, महापौर आणि मुख्यमंत्री झाले आहे, असं म्हणत गडकरींनी फडणवीसांचं कौतुक केलं. नागपूर शहराकरीता त्यांनी अनेक योजना मंजूर करून आणल्यात. बावनकुळे यांचं काम असं आहे की, ते माणसाला बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. कोणती फाईल कशी करतील. मला बऱ्याच गोष्टी माहिती आहे, पण मी सगळं सिक्रेट सांगणार नाही. कुठल्या आमदाराची सही आहे, कुणाच्या काम आहे, याचा पत्ता सुद्धा लागला नाही, असं म्हणत गडकरींनी बावनकुळेंना कोपरखळी लगावली, यावेळी सभागृहात एकच हश्शा पिकली. पक्षाचा जो प्रदेशाध्यक्ष होत असतो तो पुढे काय काय होत असतो हे सर्वांना माहिती आहे. मी आता लगेच मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देत नाही. माझी आजकाल अशी अडचण आहे की माझ्या नावाने काहीही छापतात. जे बोललो नाही तेही छापून टाकतात अरे हिंमत असेल तर तुमच्या नावाने छापाना माझा कशाला उपयोग करता. उद्या ही मीडियावाली म्हणतील, गडकरींचा फडणवीसांना संदेश, म्हणजे, मुख्यमंत्री हे फडणवीस झाले पाहिजे. पण फडणवीस हे जर उद्या दिल्लीत गेले तर तुमचा सुद्धा राज्यामध्ये विचार होऊ शकतो, असं सूचक विधान गडकरींनी केलं.
First published:

पुढील बातम्या